*उदगीरच्या अर्धवट ट्रामा केअरच्या बांधकामासाठी २.७६ कोटीच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता*  - संजय बनसोडे

*उदगीरच्या अर्धवट ट्रामा केअरच्या बांधकामासाठी २.७६ कोटीच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता*  - संजय बनसोडे


 मुंबई /उदगीर : उदगीर येथील ट्रामा केअर सेंटर च्या दुसर्‍या टप्प्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने 2.76.60 लक्ष निधी साठीची प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर ट्रामा केअर सेंटर चे बांधकाम सन २०१३ मध्ये सुरू करण्यात आले होते. 


परंतु सदर ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम निधीअभावी अर्धवट स्थितीमध्ये होते त्यामुळे ट्रामा केअर सेंटरची इमारत वापरात नव्हती. अनेक वर्षे धुळखात पडलेल्या ट्रामा केअर सेंटर चालु करण्याबाबत व निधीसाठी ना. संजय बनसोडे यांनी विशेष लक्ष घातले होते व त्यासाठी पालकमंत्री मा. ना. श्री. अमित देशमुख साहेब यांच्या मान्यतेने आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांनी २७६.६० लक्ष इतक्या रकमेचा बांधकामाचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. 


सध्या स्थितीत लातूर जिल्ह्यामध्ये covid-19 रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे त्यासाठी अपूर्ण असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्ण होणे अत्यंत आवश्यक होते जेणेकरून या इमारतीमध्ये DEDICATED COVID HOSPITAL ( DCH ) सुरू करून रुग्ण सेवा देणे गरजेचे होते. वाढती रुग्ण संख्या पाहता हे काम तात्काळ होणे गरजेचे होते. यासाठी राज्य शासनाने ट्रामा केअर सेंटर च्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामांसाठी २.७६ लाख रू. निधीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.


यासाठी मागील ५ महिन्यापासून मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब,वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. अमित विलासराव देशमुख साहेब, मा. ना. श्री. राजेश टोपे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सदरील निधी मंजूर करून घेतला आहे,त्यामुळे अनेक वर्षे धूळ खात पडलेला ट्रामा केअर सेंटर चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे ,त्यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ट्रामा केअर सेंटर प्रकल्प पूर्णत्वाला जाऊन सर्व सामान्य नागरिकाच्या आरोग्य सेवेसाठी तयार होणार आहे.