महाराष्ट्र महाविद्यालय व महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी परीक्षा सुरळीत सुरु

महाराष्ट्र महाविद्यालय व महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी परीक्षा सुरळीत सुरु


 


निलंगा- महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा अंतर्गत महाराष्ट्र महाविद्यालय व महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र शासन सीईटी सेल विभागाच्या वतीने आयोजित एमएचटी-सीईटी -२०२० परीक्षा दि. १.१०.२०२० पासून सुरु झालेल्या आहेत. सदरील परीक्षा केंद्रावर कोवीड-१९ शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करुन परीक्षा सुरळीत चालू झाल्या आहेत. पीसीबी सीईटी परीक्षा दि. ०१.१०.२०२० ते ०९.१०.२०२० या कालावधीत संपन्न होणार आहेत. तर पीसीएम सीईटी परीक्षा दि. १२.१०.२०२० ते २०.१०.२०२० या कालावधीत शासनाने आयोजित केलेल्या आहेत. 


 एमएचटी-सीईटी परीक्षेचे निलंगा येथे महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा संचलित महाराष्ट्र महाविद्यालय व महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रथमच परीक्षा शासनाने आयोजित केलेल्या आहेत. महाराष्ट्र महाविद्यालय परीक्षा केंद्रावर एम.झेड. सय्यद हे केंद्रप्रमुख,प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, प्रा. रविंद्र मदरसे, सिध्देश्वर कुंभार आदी काम पहात आहेत. तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर एन.एच. कुलकर्णी हे केंद्रप्रमुख, प्राचार्य उमेश पवार, प्रा. श्रीराम पौळकर, प्रा. डी.एस. किवडे, विजय हावडे आदी काम पहात आहेत.