प्रा राजपाल पाटील लिखित हिरकणी व यशोदा या* *पुस्तकाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रकाशन*

प्रा राजपाल पाटील लिखित हिरकणी व यशोदा या* *पुस्तकाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रकाशन*


 


उदगीर........ प्रा.राजपाल पाटील लिखित हिरकणी (कांदबरी)व यशोदा (कथासंग्रह) या दोन पुस्तकांचे प्रकाशन पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले  


या कार्यक्रमास बस्वराज पाटील नागराळकर (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ), प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. जयद्रथ जाधव, प्राचार्य शंकरराव राठोड, रमेश अण्णा अंबरखाने, उदगीरपंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे, कल्याण पाटील (उदगीर काँग्रेस तालूका अध्यक्ष) राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष समीर शेख उपस्थित होते.


यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, साहित्य हे समाज मनावर परिणाम करत असते. समाजाची सृजनशिल शक्ती साहित्यातून बळकट होण्यास मदत होत असते. दर्जेदार, योग्य साहित्य हे देश व समाज परिवर्तन घडवून असतात. विज्ञान व साहित्य हे समाजाला व देशाला दिशा देण्याचे कार्य करीत असतात, असे त्यांनी म्हंटले.


 प्रा.राजपाल पाटील हे विज्ञानाचे प्राध्यापक असले तरी त्यांना साहित्याची आवड दिसून येते. प्रा. पाटील यांनी मराठी साहित्याचे बरेच लिखाण केले आहे. त्यांच्या साहित्यात सामान्य माणसाचे प्रतिबिंब असते. सामान्य माणसाचे जगणे हे यांच्या साहित्याचा मुख्य गाभा आहे, असे मत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. तसेच प्रा. पाटील यांच्या हिरकणी याा कादंबरी व यशोदा ह्या कथासंग्रहाच्या माध्यमातून सामाजिक जागृती, सामाजिक प्रबोधन होत आहे. सामान्य व्यक्ती केंद्र बिंदू आहे अशा या कथासंग्रहाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा असे अवाहन यावेळी त्यांनी केले.