आरोग्य विभागाच्या तपासणी पथकास सहकार्य करा : तहसीलदार गणेश जाधव

आरोग्य विभागाच्या तपासणी पथकास सहकार्य करा : तहसीलदार गणेश जाधव


निलंगा: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत असून निलंगा तालुक्यात ही मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी तपासणी करणार आहेत. या कर्मचाऱ्यांना नागरिकानी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार गणेश जाधव यांनी केले आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 


तहसीलदार गणेश जाधव यावेळी म्हणाले की, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार शहरासह ग्रामीण भागातील 50 वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरिकांची यापूर्वी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे. शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली असून निलंगा तालुक्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर व 14 ते 24 ऑक्टोबर आशा दोन टप्प्यात ही मोहीम राबवली जाणार आहे. शहरात 10 तर ग्रामीण भागात 270 अशा एकूण 280 पथकाच्या माध्यमातून थर्मगल च्या सहाय्याने ताप व ऑक्सिमिटरच्या मदतीने ऑक्सिजन ची तपासणी करून कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीची व रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासह अन्य आजार असणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित केली जाणार आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.


कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.वैयक्तिक व सामूहिक अशा दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी तहसीलदार जाधव यांनी केले. 


यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौन्दळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, डॉ. काळे उपस्थित होते.


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image