*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏

*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक*


*शिक्षकांचे शिल्पकार*..........


*माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏


विद्यार्थ्यांसाठी तर शिक्षक अहोरात्र प्रयत्न करून विद्यार्थी घडवत असतो आणि स्वतःचे कर्तव्य बजावत असतो.


शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जिवाचे रान करतो आणि नवीन नवीन माहिती घेऊन त्यांना घडवण्यासाठी तो तत्पर असतो.विद्यार्थी हा निरागस आणि शाळेमध्ये घेण्यासाठी आलेला हा चिखलाचा गोळा असतो त्यांना आकार देण्यासाठी धडपडत असतो.


   परंतु धडपडणाऱ्या शिक्षकाला कुणाच्या मार्गदर्शकाची गरज असते हे कुणाला उमगलेच असे नाही, परंतु आमच्या विद्यालयांमध्ये शिक्षकांना घडवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून श्री रमाकांतराव बनशेळकीकर गुरुजी आले, शिक्षक ज्यावेळेला नोकरीला येतो तो काहीतरी ध्येय घेऊन येतो, आणि कार्य करत असतो,परंतु त्याला येणाऱ्या अडचणींना मात करत असताना खूप काही अनुभव घेत असतो, काही वेळेला खचतो नाराज होतो त्या वेळेला गरज असते मार्गदर्शकाची, अशीच आमची गरज पूर्ण केली,विनाअनुदानित शाळा त्यामध्ये भौतिक सुविधांचा अभाव या गोष्टीमुळे काही वेळेला त्रास व्हायचा पण त्यावर सुद्धा मात कशी करावी हे त्याने त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीत आम्हाला एक एक गोष्टी देऊ लागले, शिक्षण क्षेत्रातले अनुभवाची खान त्यांच्याकडे उपलब्ध आहे,कोणताही कसाही प्रसंग असो अतिशय उत्तम कार्य कसं करायचं हे त्यांनी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनातून दिलं.


"शिक्षकांचे शिल्पकार"शिक्षकांना भेटले.परिपाठातुण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो हे त्यांनी सांगितलं आणि अतिशय सुंदर परिपाठाचे नियोजन आम्हाला दिले. परिपाठामध्ये प्रार्थना पद्य, सुविचार, बडबड गीते, बोधकथा, वृत्तपत्र वाचन, सामान्य-ज्ञान अशा सर्व गोष्टीमुळे परिपाठ एकदम चांगला होऊ लागला, हा परिपाठ माईकवर घेतल्याने परिसरामध्ये एक वेगळीच छबी शाळेची निर्माण झाली, अगदी सुंदर रीतीने परिपाठ झाल्यामुळे शिक्षक वर्ग व पालकवर्ग सुद्धा खूप आनंदी झाला.जो पालक भौतिक सुविधेमुळे नाराज होता तो आता हळूहळू उत्कृष्ट कार्यक्रमामुळे प्रसन्न होऊ लागला, विद्यार्थ्यांना सुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांच्यामध्ये स्टेजवर येण्याचे धाडस मिळाल्यामुळे वर्गात सुद्धा विद्यार्थी चांगल्या प्रकारे नेतृत्व करू लागला.


शिक्षक एक आदर्श व्यक्ती, उत्तम वक्ता, गीतकार ,अभिनय निपुण, असतो आणि असला पाहिजे असा अट्टाहास गुरुजींचा असायचा. शिक्षक ज्ञानामध्ये संपन्न होते,कुणी मराठी मध्ये, कुणी गणितामध्ये, कुणी इंग्रजी मध्ये ,कुणी समाजशास्त्र मध्ये कुणी हिंदी मध्ये तर कुणी सर्व विषयात पारंगत होता, परंतु जीवनाच्या विषयांमध्ये पारंगत होण्यासाठी लागते अनुभवाची खाण आणि हे अनुभवाची खाण आम्हाला श्री बनशेळकीकर गुरुजींकडून भेटली.कोणताही कार्यक्रम घ्यायचा असल्यास स्टेज ची सुविधा नसेल तर बाक ठेवून स्टेज करायचे,नसलेल्या वस्तू आजूबाजू कडून किंवा शाळेच्या हितचिंतकका कडून काही वस्तू नम्रपणे घेऊन परत त्यांना वापस द्यायच्या आणि शाळेचा विकासामध्ये त्यांचाही वाटा हळूहळू घ्यायचा असे करून आम्ही प्रत्येक कार्यक्रम उठावदारपणाने घेऊ लागलो. 🌸"विद्या विनयेन शोभते". असे काका आम्हाला नेहमी सांगायचे... नम्रता हा ज्ञानाचा उत्तम अलंकार आहे .असे सांगून सर्व शिक्षकांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी सतत त्यांनी मार्गदर्शक म्हणून खूप चांगलं कार्य आमच्या शिक्षकांच्या जीवनामध्ये त्यांनी सुरू केलं.


विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विविध कार्यक्रम व्हायचे. निसर्ग शाळा ,सहल अगदी सुंदर नियोजन आम्ही करत होतो, व आहोत. परंतु शिक्षकांसाठी सुद्धा अशा प्रकारचे नियोजन केले ते आमचे मार्गदर्शक शिक्षकांचे शिल्पकार......


शिक्षकांनासुद्धा निसर्ग शाळा शैक्षणिक सहली झाल्या पाहिजेत हा त्यांचा विचार आमच्या संस्थेमध्ये मांडण्यात आला आणि तो मंजूर झाला .अतिशय सुंदर प्रकारे हे दोन्ही उपक्रम होऊ लागले. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांची निसर्ग शाळा होऊ लागली आणि त्या ठिकाणी एका आदर्श लेखक कवी यांचे विचार शिक्षकांपुढे मांडून,त्यांच्या विचारांमध्ये प्रबोधन करण्याचे कार्य होऊ लागले आणि नंतर वनभोजनाचा आनंद सुद्धा सर्वजण मिळून घेऊ लागलो, शाळेमध्ये एक कौटुंबिक वातावरण सुंदर रीतीने निर्माण करण्याचे श्रेय गुरुजींनी केले. दुसरी सहल म्हणजे आपल्या तालुक्यात जिल्ह्यात जवळपास कुठेही एक आदर्श शाळा असली की लगेच त्या शाळेला भेट द्यायची आणि ज्या.. ज्या.. चांगल्या गोष्टी आहेत त्या.. त्या ...नमूद करून घेऊन येऊन आपल्या विद्यालयात विद्यार्थी, शिक्षकांसाठी, शाळेच्या उन्नतीसाठी नवीन योजना राबवल्या . उत्कृष्ट कार्यक्रम ,स्नेहसंमेलन, सहली ,कार्यशाळा होऊ लागली.


कुठलेही निर्णय शिक्षकांनी घेतले असता त्या निर्णयावर ठाम राहायचं. आणि विद्यार्थ्यांना निर्णय क्षमता कशी घेतली पाहिजे हा निर्णय त्यांनीच आम्हा शिक्षकांना दिला.एखादी गोष्ट चुकीची असेल तर,त्यात सुधारणा त्वरित करावे.तिथेच त्या वेळेला तिथेच सुनावले पाहिजे आणि त्याच्यात बदल केले पाहिजे असा अट्टहास असायचा. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नसतं परंतु काळ सुखावतो हे त्यांचे विचार अतिशय सत्यवादी आहेत हे आम्हाला दिसून आले, इतिहास वाचायचा आणि स्वतःही घडवायचा असे त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले,.आणि एखादी गोष्ट पटली नाही व आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत परंतु करायचे काय? असा विचार मनात येताच उद्धटपणे न वागता सरळ मार्गी कार्य करावे जेणेकरून त्यावर काळ उत्तर देतो.. असे म्हणून शिक्षकांना समाजात कसे वावरायचे हे त्यांनी आम्हाला खूप छान शिकवण दिली. अशा अनेक मार्गदर्शनातून त्यांनी शिक्षकांना घडवलं.संपूर्ण देशामध्ये विद्यार्थी घडविण्याचे कार्य होत असते परंतु शिक्षक घडवण्याचे कार्य अगदी चांगल्या प्रकारे आमच्या विद्यालयात झाले असे मला वाटते. शिक्षकांना प्रशिक्षण देऊन, 🌸नवे ते हवे🌸 ही संकल्पना मनात बाळगणे हा मोलाचा संदेश त्यांनी दिला, आपला जीव विद्यार्थ्यांमध्ये ओतायचा... त्यांचा आत्मा आपण जाणायचा..... विद्यार्थ्यांची आई होता आलं पाहिजे... मग बस्स.. विद्यार्थी घडला म्हणून समजून घ्या! असं काका म्हणत असतात.


   शिक्षक मातृ- हृदयी, नाणे गुरुजी न होता सानेगुरुजी झाले पाहिजे, सर होऊन सरपण होण्यापेक्षा, गुरुजी होऊन गुरुमाऊली व्हावे... स्वामी विवेकानंद त्यांच्या गुरुमुळे घडले,अनेक विद्यार्थी गुरुमुळे घडतात .विद्यार्थी हेच आपले पुरस्कार आहेत असे समजावे असे त्यांनी मार्गदर्शन केले.


      शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है ! 


   आपल्या इच्छेला गरुडाचे पंख लावा म्हणजे यशाची भरारी तुम्ही नक्कीच घ्याल! 


   जीवनामध्ये विद्यार्थ्यांकडे आपल्या अशा आठवणी ठेवायच्या ती जेणेकरून तो घडला पाहिजे, त्याच्या मनामध्ये देशप्रेम, सत्यता, कष्टाळू वृत्ती मनामध्ये रुजली पाहिजे.


     🌸 नर करणी करे तो... नर का नारायण बन जाए!🌸


असे अनमोल मार्गदर्शन करणारे शिक्षक वृंदाचे श्रद्धास्थान, गुरु, शिक्षकांचे शिल्पकार...... 


 *माननीय श्री रमाकांतराव बनशेळकीकर गुरुजी*.


    *सौ.मंजुषा कुलकर्णी*


*सरदार वल्लभ भाई पटेल प्राथमिक* *विद्यालय उदगीर* ...


    *९८८१६९२४३७*


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही