त्यागाचे जगणे समाजापुढे आणण्याची आज गरज:धनंजय गुडसूरकर  "श्रीराम:एक स्मरणिका"चे प्रकाशन

 


 


त्यागाचे जगणे समाजापुढे आणण्याची आज गरज:धनंजय गुडसूरकर 


"श्रीराम:एक स्मरणिका"चे प्रकाशन


उदगीर :   "त्यागाचे जगणे काल्पनिक वाटण्याचा हा काळ असून ,समाजासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्यांची थोरवी समाजापुढे आणणे ही आजची गरज आहे.अॕड.विश्वंभरराव कुलकर्णी यांच्या लेखणीने हे कार्य प्रभावीपणे केले आहे"असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांनी केले."श्रीराम:एक स्मरणिका"या ग्रंथाचे प्रकाशन गुडसूरकर यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी लेखक मारोतीराव वझरकर होते.व्यासपिठावर लेखक अॕड .विश्वंभरराव कुलकर्णी  ,प्रा.सुरेश गर्जे,प्रा.बी.डी.कुलकर्णी ,सौ.वृषाली कुलकर्णी उपस्थित होते.


 सौ.मालती कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. "रामराव  कुलकर्णी मेहकरकर यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग ,संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदान जेवढे महत्त्वाचे होते तितकेच त्यांचा समतेचा लढा महत्वाचा होता.पुरोगामी विचार त्यांनी केवळ सांगितला नाही तर तो जगण्यात आणला.देशासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवतानाच न्याय मागण्यासाठी आपल्या सरकारशीही त्यांनी दोन हात केले.सिमाभागाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी व त्यांच्या पिढीने दिलेले योगदान अतुलनीय आहे.सिमाभागाला न्याय मिळाला नाही व मुक्तीसंग्रामाची नोंद  हवी तशी घेतली गेली नाही त्यामुळे या पिढीने केलेला त्याग व भोगलेला संघर्ष आजही उपेक्षित असल्याची खंत गुडसूरकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. "चिमणाचिमणीचा संसार करणाऱ्यांपैकी ते नव्हते ,समाजातील वंचितांची काळजी करीत त्यांना आधार देतानाच त्यांना  स्वतःच्या पायावर उभे करून  सामाजिक स्थान मिळवून देणारे रामराव कुलकर्णी हे समाजसुधारकच होते" अशा शब्दांत गुडसूरकर यांनी त्यांचा गौरव केला.यावेळी लेखक अॕड.विश्वंभरराव कुलकर्णी , अनंत दीक्षित,प्रा.सुरेश गर्जे ,अनुराधा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपात मारोतीराव वझरकर यांनी रामराव कुलकर्णी यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याची थोरवी सांगितली.आपल्या जगण्यातून त्यांनी दिलेला आदर्श प्रेरक असल्याचे त्यांनी सांगितले . केला.स्मिता कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन तर मकरंद कुलकर्णी यांनी आभार मानले. उषा पाटील,सीमा दीक्षीत,मुकुंद कुलकर्णी ,स्वाती मुखेडकर,उदय दीक्षित गणेश कुलकर्णी ,दत्तात्रय पाटील ,संजय अंबरखाने प्रणव मुखेडकर आदींनी पुढाकार घेतला.


 


टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज