पद्मश्री डॉ. विखे पाटील कृषी परिषदेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
उदगीर -पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद व मराठा सेवा संघ उदगीरच्या वतीने 10 वी व 12 वी तील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले होते. यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे , शिक्षण विस्तार अधिकारी नितीन लोहकरे , शिवाजी पाटील तोंडचिरकर , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल काकडे , जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष किशनराव बिरादार , मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक माधव हलगरे, अनिताताई जाधव , रामेश्वर बिरादार , संतोष बिरादार , बाबुराव आंबेगावे, पुषपा ताई जाधव, अनीता जगताप यांची प्रमुख उपस्थिती होते.
यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आयोजकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन वसतिगृहाचा व मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मतदारसंघात होत असलेल्या कामाची माहीती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक, पद्मश्री वि.वि. पा.कृषी परिषदेचे प्रदेशसचिव प्रा. विवेक सुकने यांनी केले . परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जात असलेल्या उपक्रमाविषयी त्यांनी माहिती दिली.
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढगे यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता लवकर करण्याची मागणी करुन मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश व्हायला हवा असे मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. संभाजी जाधव व भरत पुंड यांनी केले. बबीता पाटील यांनी जिजाऊ वंदना घेतली तर प्रतिभा मुळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, उत्तम मोरे , अंगद पाटील नागलगावकर, भास्कर मोरे , संदीप जाधव, कालीदास बिरादार, कमलाकर मुळे , सतीश पाटील माणकीकर आदींनी परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा