उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड

 उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे  

                        मुख्याधिकारी भारत राठोड 

               उदगीर नगर परिषद उदगीर व पडल टू गो ग्रुपच्या वतीने उदगीर शहरामध्ये दि.१७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८.०० वाजता एक पडल आरोग्यासाठी, एक पडल पर्यावरणासाठी व एक पडल भविष्यासाठी या निर्धाराने सायकल रलीचे उदघाटन लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.पृथ्वीराज बी.पी.यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

             नगर परिषद उदगीरच्या माध्यमातून शहरामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असते त्याचाच एक भाग म्हणून माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून नगर परिषदेने स्वतः एक दिवस पेट्रोल / डिझेल गाड्या न वापरण्याची शपथ घेतली असून पूर्णपणे एक दिवस सायकलने प्रवास करावे ही मोहीम यशस्वीपणे राबवित आहे. 

               पर्यावरण व आरोग्य संवर्धनासाठी आणि प्रदूषणमुक्तीसाठी सायकल रलीचे आयोजन केलेले आहे. उदगीर शहर हे प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल करावी म्हणून ही रली नगर परिषद कार्यालय ते शिवाजी चौक ते क.कृष्णकांत चौक ते शाहू चौक ते उमा चौक ते मुक्कावार चौक ते आर्य समाज चौक ते चौबारा ते किल्ला असा मार्ग आहे.  तरी संपूर्ण उदगीर शहरवासियांना या रलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी भारत राठोड यांनी याद्वारे केले आहे. याच वेळी उदगीरच्या ऐतिहासिक असणाऱ्या किल्ल्याची साफसफाई करण्यात येणार आहे. 

              सबंध जग हे कोरोना सारख्या महाभयंकर आजाराशी सामना करीत होते त्याच काळामध्ये उदगीर शहरामध्येही या आजाराने चांगलाच प्रकोप केलेला होता, येथील परिस्थितीही तशी बिकटच झालेली होती  उदगीर शहरामधील असाच एक वर्ग आहे की तो इतरांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जोखीम घेऊन कोरोना कालावधीमध्ये समाजाला या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या आपल्यापैकीच काही जणांना कोरोना योद्धा म्हणून जिल्हाधिकारी मा.श्री.पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले  आहेत.

Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image