उदगीर अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २०२० चे वाड:मय पुरस्कार जाहीर

 उदगीर अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २०२० चे वाड:मय पुरस्कार जाहीर


मुंबई येथील सदानंद पुंडपाळ, पुणे येथील सुनिता राजे पवार, कारंजा येथील प्रदीप देशमुख मानकरी



उदगीर : येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारे वाड:मयीन पुरस्कार (सन २०२०) गुरूवारी घोषित करण्यात आले. या पुरस्कारासाठी मुंबई येथील सदानंद पुंडपाळ, पुणे सुनिताराजे पवार तर कारंजा येथील प्रदीप देशमुख यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
कै. राजकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार मुंबई येथील शिवाजी पुंडपाळ यांच्या नाचू वाचू आनंदाने या बालकथा संग्रहास, कै. लक्ष्मीबाई विठोबा केदार स्मृती पुरस्कार कारंजा येथील प्रदीप देशमुख यांच्या गर गर भोवरा या बालकविता संग्रहाला तर कै. विजयकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार पुणे येथील सुनिताराजे पवार यांच्या कांडा या बालकादंबरी संग्रहाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५०५१ / - रू. रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रतिनिधी संजय ऐलवाड, अध्यक्ष प्रा. रामदास केदार, कार्यवाह रसूल दा. पठाण यांनी दिली. यावेळी समन्वयक प्रशांत शेटे, उपाध्यक्ष दयानंद बिरादार, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेंबडे, सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, ज्योती डोळे, चंद्रदीप नादरगे, चंद्रशेखर कळसे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. उदगीर येथील अ. भा. बालकुमार साहित्य संस्था स्थापनेला ३ वर्षे पूर्ण झाली असून यापूर्वी मुंबईचे एकनाथ आव्हाड, नाशिक येथील संजय वाघ सोलापूर च्या आशा पाटील व पुणे येथील संंजय ऐलवाड यांना गौरविण्यात आले आहे. तर सन २०१९ चे शिवाजी चाळक पुणे, सुनंदा गोरे औरंगाबाद व वर्षा चौगुले, सांगली यांना जाहीर झाला आहे.

Popular posts
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image