मराठी राजभाषा दिनानिमित्त उदयगिरीत 28 फेब्रुवारीला ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकरांचे व्याख्यान

मराठी राजभाषा दिनानिमित्त उदयगिरीत 28 फेब्रुवारीला


ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकरांचे व्याख्यान


उदगीर : मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात 28 फेब्रुवारी 2022 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे “मराठी भाषा दिन व साहित्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष बसवराज पाठील नागराळकर राहणार आहेत. व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष तथा म. सा. प. उदगीर अध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले आहे.