स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रस्तावित स्मारकाचे भूमिपूजन संपन्न

 स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रस्तावित स्मारकाचे भूमिपूजन संपन्न 

निलंगा- महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात महत्वपुर्ण योगदान देणारे विकासपुरुष, काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्राच्या राजकारणात धाडसी निर्णय घेणार द्रष्टा राजकारणी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी असलेली निष्ठा अखेरपर्यंत जपणारे निष्ठावंत नेतृत्व, सर्वच क्षेत्रात आपल्या नैतिकतेचा दबदबा निर्माण केलेले नैतिकतेचे महामेरु स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समितीच्या संकुलात संपन्न झाला.

स्व. निलंगेकर यांनी महाराष्ट्र शिक्षण समितीची स्थापना करुन तळागाळातल्या लोकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहंचवली त्याच शिक्षण समितीच्या प्रांगणात स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले. निलंगेकर यांचे हे स्मारक नविन पिढीला प्रेरणा व दिशा देणारे ठरणार आहे. 

या भूमिपूजन सोहळ्यासाठी स्व.डॉ. निलंगेकर यांच्या पत्नी सुशिलाबाई पाटील निलंगेकर, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. शरदराव पाटील निलंगेकर, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे चिटणीस अरविंद पाटील निलंगेकर, डॉ. अरुण डावळे, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. सर्वेश पाटील निलंगेकर, संगिताताई अशोकराव पाटील निलंगेकर, वृषालीताई विजय पाटील निलंगेकर, व सर्व कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. 

भूमिपूजन समारंभ स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर  स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. स्मारक समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भागवत पौळ, सचिव दिलीपराव धुमाळ, सदस्य प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, मुख्याध्यापक आर.के. पाचंगे, मुख्याध्यापक मोहन नटवे, मुख्याध्यापक गुंडादेव पाठक, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य भरत गोरे, डॉ. भास्कर गायकवाड, शिला देशमुख, सय्यद सर आदींनी परिश्रम घेतले.   

यावेळी निलंगा विधानसभा मतदार संघातील प्रतिष्ठीत नागरिक, सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, महाराष्ट्र शिक्षण समितीतील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज