मुंबई व तिरुपती नियमित रेल्वेसाठी पाठपुरावा करू : विभागीय व्यवस्थापक अभय गुप्ता


मुंबई व तिरुपती नियमित रेल्वेसाठी पाठपुरावा करू : विभागीय व्यवस्थापक अभय गुप्ता

उदगीर : लातूर ते तिरुपती व बिदर ते मुंबई व्हाया उदगीर ही रेल्वे नियमित चालू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करू अशी ग्वाही रेल्वेचे सिंकदराबाद येथील दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांनी उदगीर येथील शिष्टमंडळास दिली.

    मंगळवारी (दि. 22 रोजी) उदगीर रेल्वे स्थानकात विभागीय व्यवस्थापक सिकंदराबाद विभाग दक्षिण मध्य रेल्वे (DRM)हे परीक्षण दौऱ्यावर आले होते. यावेळी उदगीर येथील रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने विभागीय व्यवस्थापक गुप्ता यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी यावेळी स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत रेल्वे स्थानक परिसरात पालिकेच्या वतीने सुलभ शॉचालय उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी विभागीय व्यवस्थापकांना पत्र देऊन केली आहे.

      विलास साखर कारखाना युनिट 2 च्या वतीने माल वाहतुक सुलभ होण्याच्या दृष्टीने योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी उदगीरकरांनी केलेल्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत विभागीय व्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांनी दुसरा प्लॅटफॉर्म शेड 48 मीटर, सी. सी. टी. व्ही, कोच डिस्प्ले बोर्ड मंजूर केल्याची घोषणा केली व मार्च 2022 अगोदर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्याना दिल्या. उदगीर स्थानकातून होणाऱ्या मालवाहतुकीतीस प्राधान्य देण्यास प्रशासन प्राथमिकता देत असून लहान शेतकऱ्याच्या उत्पादनासही सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

       यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, उमाकांत वडजे, साईनाथ चिमेगावे, अहमद सरवर, विजय पारसेवार, अजीम दायमी, शंकर मुक्कावार, रवींद्र हसरगुंडे, अश्फाक शेख, शैलेश कस्तुरे, रामभाऊ मोतीपवळे, विक्रम हलकीकर, इरफान शेख, बसवराज डावळे, अशोक तोंडारे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
प्रभाग 8 मध्ये निर्जंतुकिकरणाची फवारणी उदगीर:
इमेज
महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान.    मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम.  
इमेज
लॉयनेस क्लब गोल्ड च्या अध्यक्षपदी सौ. संगीता नेत्रगावे पाटील यांची निवड.*
इमेज
मराठी राजभाषा दिनानिमित्त उदयगिरीत 28 फेब्रुवारीला ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकरांचे व्याख्यान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज