निलंगा ऊस उत्पादक चिंतेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे

 निलंगा ऊस उत्पादक चिंतेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे


 निलंगा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे विधानसभा कार्याध्यक्ष संदिप मोरे यांच्या नेतृत्वात विधानसभा अध्यक्ष सुधीरदादा मसलगे यांच्या सुचनेनुसार मा. ना. अजितदादा पवार यांची काल मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली .

 यावेळी निलंगा तालुक्यातील अंबुलगा व किल्लारी साखर कारखाने बंद असल्याने निलंगा तालुक्यातील शेतकरी 12-14 महिने होऊन सुध्दा कुठे ऊस कुठे घालायचा यासंदर्भात चिंतेत आहे. 

जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटिल यांच्याही हि बाब निदर्शनास आणुन दिली होती व तसेच जिल्हाध्यक्ष यांनी भाऊसाहेब बिरादार साखर कारखान्यावरिल अधिकारी गुरव  यांनाही निलंगा तालुक्यातील ऊसासंदर्भात सुचना दिल्या होत्या तरीपण गाड्यांचा तुटवडा असल्याने शेतकरी चिंतेत आहेत ही बाब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर घालण्यात आली व त्यांनी साखर आयुक्ताना सुचना देवुन वेगवेगळ्या कारखान्याना सुचना देवुन निलंगा तालुक्यातील शेतकरी यांचे ऊसाचे एक टिपरुही ठेवणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिष्टमंडळाला दिली. 

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष अंगद जाधव, विधानसभा कार्याध्यक्ष संदिप मोरे, प्रदेश सरचिटणीस सोशल मिडिया किरण सोळुंके आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image