साहित्य संमेलन नियोजनात कारवा फाउंडेशनचा सहभाग

 साहित्य संमेलन नियोजनात कारवा फाउंडेशनचा सहभाग

 उदगीर : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कारवा  फाउंडेशनचा विविध उपक्रमात सहभाग असल्याची माहिती पदाधिकारी व फाउंडेशनच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीसाठी कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सह्योग बँकेचे चेअरमन रमेश अंबरखाने, ऍड. आदिती पाटील,  विवेक होलसंबरे, प्रा. डॉ.राहुल आलापुरे, गुरुप्रसाद पांढरे, ओमकार गांजुरे, गिरीश जाधव, शाकिब सोफी यांची उपस्थिती होती. वृक्षारोपण, पाणीबचत, काटकसरीने पाण्याचा वापर यासंबंधी जनजागृती करण्यासाठी स्टॉल उभारणे, ग्रंथदिंडीत सायकल रॅली ,पर्यावरण रथ, पर्यावरण परिसंवाद संयोजनात सक्रिय सहभाग अशाप्रकारे फाउंडेशन कार्यरत राहणार आहे, फाऊंडेशनच्या कामाबद्दल प्रा. पटवारी यांनी समाधान व्यक्त केले. कार्याध्यक्ष नागराळकर म्हणाले, फाउंडेशनच्या मदतीने साहित्य संमेलनात अनेक चांगले उपक्रम राबविण्याचा मानस आहे.