महाराष्ट्रातील चारित्र्यसंपन्न, नितीवान आणि निष्ठावंत व्यक्तीमत्व स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर -प्राचार्य डॉ. संजय वाघमारे

 *महाराष्ट्रातील चारित्र्यसंपन्न, नितीवान आणि निष्ठावंत व्यक्तीमत्व स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर*

-*प्राचार्य डॉ. संजय वाघमारे*


निलंगा- महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या चारित्र्याचा आणि नितीमत्तेचा आगळावेगळा ठसा उमटवणारे, पक्षाशी एकनिष्ठ राहणारे नेतृत्व म्हणून महाराष्ट्र स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरांना कधीही विसरणार नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणा-या आपल्या ५६ वर्षाच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात विविध खात्यांच्या माध्यमातून विकासाची काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. याशिवाय शिक्षणाच्या क्षेत्रात निलंगा आणि परिसरात शाळा, महाविद्यालयांची स्थापना करुन ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहंचवण्याचे महत्वाचे काम स्व. डॉ. निलंगेकर साहेबांनी केले असे मत नळेगाव येथील शिवजागृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय वाघमारे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र महाविद्यालयात आयोजित स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानमालेत बोलत होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या जीवनातील अनेक घटना आणि प्रसंगांच्या आधारे जीवनमुल्ये व आदर्श उपस्थितांसमोर उभे केले. 

याप्रसंगी विचारमंचावर अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, डॉ. एस.एस.पाटील आदी उपस्थित होते. 

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. भागवत पौळ यांनी स्व. डॉ. निलंगेकर साहेबांच्या कार्य आणि कर्तृत्वाची माहिती देऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश प्राप्ती करण्यासाठी स्व. डॉ. निलंगेकर साहेबांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनापाठीमागची भुमिका उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम यांनी प्रास्ताविकातून मांडली. 

स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही प्रातिनिधीक स्वरुपात स्व. डॉ. निलंगेकर साहेबांना आपल्या वक्तृत्व कलेतून अभिवादन केले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र महाविद्यालय, महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदीर व महाराष्ट्र विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. भास्कर गायकवाड व प्रा. श्रीकृष्ण दिवे यांनी केले तर आभार प्रा. सुरेश कुलकर्णी यांनी मानले.

टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज