महाराष्ट्रातील प्रश्न संपले...?

 महाराष्ट्रातील प्रश्न संपले...?

बालपणी अनेक मित्र गोट¬ा, कोया वा ईतर अनेक खेळ खेळतात. हल्लीच्या काळात हे खेळ मोबाईलच्या वापरामुळे कालबाह्र झालेले आहेत. मात्र काही वर्षापर्यंत हा खेळ बालमित्रामध्ये खेळला जात असे. त्यावेळी माझ्या गोट¬ा तु चोरल्या, याच्या गोटया याने चोरल्या म्हणून एकमेकांवर चो­यांचे आरोप करीत तू चोर का मी चोर अशा प्रकारची भांडणे बालमित्रांमध्ये होत असत. मात्र लागलीच काही काळात हे भांडण मिटविण्यासाठी इतर सवंगडी पुढाकार घेऊन हे भांडण मिटवित असत. मग कोणी चॉकलेट खाऊ घालून तर कोणी बिस्कीट खाऊ घालून हे भांडण मिटत असे. अशाच प्रकारची भांडणे सध्या महाराष्ट्रात पहावयास मिळत आहेत. मात्र ही भांडणे या लहान बालमित्रांची नाहीत तर राज्याचा कारभार करणा­या एकमेकांसोबत काही काळ सत्ता भोगलेल्या बालमित्रांमध्ये सुरू आहे. ही भांडणे पाहीली असता आज महाराष्ट्रातील सर्वच प्रश्न संपले आहेत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील बेरेाजगारी, पाणी टंचाई, महिला अत्याचार, शिक्षणाचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, एस. टी. कर्मचा­यांचे प्रश्न असे कुठलेच प्रश्न आता शिल्लक राहिले नाहीत बरं.! बरं राहिले तरी याकडे लक्ष तरी कोणी द्यावे असा प्रश्न आज आम्हाला पडला आहे. आज सर्व दृष्टीने महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनलेला आपल्याला दिसेल. त्यामुळेच आता हे प्रश्न शिल्लक राहिलेले नसल्याने मग शांत बसून कसे चालेल म्हणून आपल्या राज्यातले राजकारणी आता त्या लहान मुलांच्या गोट¬ा चो­या सारखे भांडत आहे अशी स्थिती आज महाराष्ट्रात दिसून येत आहे. भाजपाचे खासदार किरीट सेामय्या रोज उठून शिवसेनेच्या नेत्यांवर मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. त्यांना जेलमध्ये पाटविण्याची धमकी देत आहेत. तर त्यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे खासदार संपादक संजय राऊत हे देखील तितकेच आक्रमक होऊन मी नाही चोरल्या गोट¬ा तूच चोरल्या अशा प्रकारचा आव आणून सोमय्यांच चोर असल्याचे सांगत त्यांना जेलची हवा खायला लावू असे स्पष्टपणे सांगत आहेत. या दोघांचे चालू असतानाच आमचे केंद्रीय मंत्री राणे साहेब गप्प कसे बसतील बरं? त्यांनीही आक्रमक होऊन मातोश्रीमधील गोष्टी बाहेर काढू? तुम्ही काय केले आमच्याकडे सगळी कुंडली आहे ? असे पत्रकारांसमोर येऊन सांगतात. राणेंनी डरकाळी फोडली लगेच सेनेचे दुसरे एक राऊत माध्यमासमोरच कोकणातील राजकीय हत्यामध्ये कोणाचे हात ओले आहेत हे आम्ही बाहेर काढू त्यामुळे गप्प बसा असा दम देतात. हे सगळे पाहिले की आम्हाला बालपणीच्याच आमच्या भांडणाची आठवण येते. एखाद्याने गोट¬ा चोरल्या की दुसरा एक मित्र म्हणत असतो मला दोन गोट¬ा दे नाहीतर मी तु चोरल्या म्हणून सांगतो बघ? असा प्रकार सध्या या राजकारण्यामध्ये दिसून येत आहे. कोणाचेच काही बाहेर  येत नाही मात्र निवडणूका समोर आल्या की तु किती चोर मी किती चोर म्हणून हे राजकारणी भांडत आहेत. मात्र महाराष्ट्रासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी कोण जबाबदारी घेऊन काम करणार हे सांगत नाहीत. त्यामुळे सामान्य माणूस मात्र कोणी का चोरी करनाव रे बाबानो...आमचं आम्हाला न्याय द्या बाबा असे म्हणत आपला टाहो फोडत आहे हे मात्र नक्की.

Popular posts
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 14 जूनला उदगीरात आयटीआय प्रवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image