अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप

 


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप


उदगीर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दि. २२, २३व २४ एप्रिल २०२२ रोजी होत असून त्यास स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ सर्वतोपरी मदत करील असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर जगताप यांनी व्यक्त केले.

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात आयोजित सहविचार सभेत बोलत होते. मंचावर संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, ॲड. महेश मळगे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. जगताप म्हणाले साहित्याच्या वाचनाने माणूस समृद्ध होतो. शरीराच्या सौंदर्यापेक्षा अंतरंगाचे सौंदर्य महत्वाचे असते. अंतरंगाची सौंदर्यपूर्णता वाचनावर अवलंबून असते, जो साहित्याचे वाचन करतो तोच वाचू शकतो. तिरुके म्हणाले साहित्य हा समाजजीवनाचा आरसा असतो. जीवनाच्या सुखद वाटचालीत साहित्याचे योगदान मोठेच असते. मन व मनगटाला आकार साहित्यच देवू शकते. डॉ. मस्के म्हणाले माय, माती आणि मातृभाषेसाठी जगण्यामरण्याची प्रेरणा साहित्यातून मिळते. ॲड. मळगे म्हणाले साहित्याच्या वाचनातून आनंद व जीवनास दिशा मिळते म्हणून रसिकांनी संमेलनासाठी येण्याचे आवाहन केले.  सूत्रसंचलन प्रा. संजय हत्ते यांनी केले. आभार राजेंद्र संगेकर यांनी मानले.

टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज