काँग्रेसने जिल्ह्यात स्वबळावर निवडणूकलढवून दाखवावी : आ. निलंगेकर

काँग्रेसने जिल्ह्यात स्वबळावर निवडणूकलढवून दाखवावी : आ. निलंगेकर


निलंगा - स्वबळावर निवडणूक लढविण्याची, लातूर जिल्ह्यासह मराठवाडा भाजमुक्त करण्याचा
वल्गना करणाऱ्या काँग्रेस पक्षाने राज्यातील निवडणूक लढविण्याचा निर्णय काय होईल ते होईल किमान लातूर जिल्ह्यात तरी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी. असे अवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री अमित देशमुख यांना माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले आहे.
निलंगा तालुक्यातील काही भाजपा कार्यकर्त्यांचा मुंबई येथे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला.
त्याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातूरसह मराठवाडा भाजपा मुक्त करण्याचा पटर्न निर्माण करण्याचे सुतोवाच करून आगामी स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या निवडणुका
स्वबळावर लढवणार असल्याचे
जाहीर केले होते. गेली अनेक
वर्षे राजकारणात सोबत काम
करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्ष
सोडून गेल्यानंतर वेदना तर होत
असतातच. मात्र राजकारणात
राजकारणात जास्त महत्त्वकांक्षा निर्माण झाली की, कांही कार्यकर्ते पक्षांतर करत
असतात त्याबद्दल मी कांही बोलणार नाही असे म्हणत त्यानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई येथे कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळेस केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत संभाजीपाटील निलंगेकर यांनी काँग्रेसने
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका राज्याचे सोडा किमान लातूर जिल्ह्यात तरी स्वतंत्र लढवून दाखवावी
असे खुले आव्हान दिले. पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी नव्या घरी सुखाने नांदावे अशा शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षापासून असलेले ओबीसी समाजाचे आरक्षणाचा हक्क महाविकास आघाडी सरकारने हिरावून घेतले आहे. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहीला. यास सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एक चकार शब्दही बोलले नाहीत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची ओबीसी, मराठा समाजाला आरक्षण द्यायची नियत नसल्याची टिका त्यांनी यावेळी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, किशोर जाधव उपस्थित होते.
Popular posts
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image