जागतिक महिला दिनी जन्मलेल्या मुलींचे स्वागत : महिला काँग्रेसचा उपक्रम

 जागतिक महिला दिनी जन्मलेल्या मुलींचे स्वागत : महिला काँग्रेसचा उपक्रम


उदगीर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला काँग्रेस च्या वतीने महिला दिनी येथील उपजिल्हा रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत करण्यात आले व जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार करण्यात आले.
प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव उषा कांबळे यांच्या पुढाकाराने उपजिल्हा रुग्णालयात जागतिक महिला दिनी जन्माला आलेल्या मुलीचा कपडे देऊन व मातांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार, डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. मेघश्याम कुलकर्णी, डॉ. राणी पवार, डॉ. आरती वाडीकर, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव उषा कांबळे, शहराध्यक्ष ललिता झिल्ले, बालिका मूळे, सरोजा बिरादार, नगरसेविका रेखा कानमंदे, बबिता भोसले, चारुशीला पाटील, यांची उपस्थिती होती.