साहित्य संमेलनाची उंची वाढवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे यावे -राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन






साहित्य संमेलनाची उंची वाढवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे यावे

-राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन



उदगीर : अखिल भारतीय साहित्य संमेलनाची संधी उदगीरच्या रूपाने लातूर जिल्ह्याला मिळाली आहे. जिल्हाभरातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी या संमेलनात आपले योगदान देऊन संमेलनाची उंची वाढवण्यासाठी पुढे यावे. या साहित्य संमेलनाचे नाव जगभरात जाण्यासाठी प्रशासनाने तत्पर राहण्याचे आवाहन संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील साहित्य संमेलनाच्या सभागृहात साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, पंचायत समितीचे सभापती शिवाजी मुळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार रामेश्वर गोरे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता एम.एम.पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय देवकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार ,उपविभागीय पोलिस अधिकारी डेनीयल बेन, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे, महादेव नौबद्दे, डॉ श्रीकांत मध्वरे, डॉ आर. एन लखोटिया, प्राचार्य आर आर तांबोळी उपप्राचार्य डॉ राजकुमार मस्के, मादलापूरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, ताहेर हुसेन, श्याम डावळे, जितेंद्र शिंदे, गजानन साताळकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले
उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांनी संमेलनासाठी जे जे आवश्यक आहेत त्या त्या सुविधा निर्माण करून द्याव्यात. या साहित्य संमेलनाचे नाव जगभरात जाणार असून संबंध लातूर जिल्ह्याचे नाव होणार आहे. या संमेलनासाठी समाजातील सर्व घटक संस्था सर्व पक्ष साहित्यिक सर्वांचे योगदान मिळत असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांच्या सोबत संमेलनासाठी योगदान द्यावे.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले सर्व विभाग प्रमुखांनी साहित्य संमेलनाची निगडित असलेली सर्व कामे अवघ्या दहा दिवसात सुरू करावीत. संमेलन परिसरात व संमेलन स्थळी जोडणारे सर्व रस्त्यांची कामे सुरू करण्याचे निर्देश देत सर्व प्रशासकीय अधिकारी साहित्य संमेलनासाठी योगदान देण्यासाठी सर्वांसोबत असल्याचे यावेळी सांगितले.
प्रास्ताविक नियोजन विभाग प्रमुख दिनेश सास्तुरकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी संमेलनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे विवेचन केले. संमेलन स्थळी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव जेवळीकर यांनी तर उपस्थितांचे आभार संस्थाध्यक्ष श्री नागराळकर यांनी मानले.
------------------------------------------
एक लाखांचा धनादेश....
------------------------------------------

हे साहित्य संमेलन दर्जेदार व जगामध्ये नावलौकिक होण्यासाठी अनेक संस्था व व्यक्ती आर्थिक निधी देण्यासाठी पुढे येत आहेत.या कार्यक्रमात मलकापूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी मलकापूर ग्राम पंचायतीच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश संयोजन समितीकडे सुपूर्त केला.
Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही