शिक्षण महर्षी कै. विजयकुमार पाटील शिरोळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भागवत कथा प्रारंभ

शिक्षण महर्षी कै. विजयकुमार पाटील शिरोळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भागवत कथा प्रारंभ


उदगीर (प्रतिनिधी)- येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण महर्षी प्रा. कै विजयकुमार बाबाराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून  दिनांक 10 मार्च 2022  पासून भागवत कथेचा आरंभ झाला आहे.

       ह भ प वामन महाराज जाधव मुरंबी कर यांचा दुपारी २ ते ५ या वेळेत सुश्राव्य अशी भागवत कथेची सुरुवात झालेली आहे  या कथेची सांगता दिनांक १७ मार्च २०२२ रोजी होणार आहे. तरी या भागवत कथेचा व विविध सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचा उदगीर शहर व परिसरातील भाविक भक्त व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्रीमती मीनाक्षी विजयकुमार पाटील शिरोळकर ,एड.विशाल विजयकुमार पाटील शिरोळकर ,श्री विराज विजयकुमार पाटील शिरोळकर व सौ शिवांगी विक्रमसिंह खताळ आणि सर्व शिरोळकर परिवाराने केले आहे.  या भागवत कथा कार्यक्रमाचे स्थळ शिवाजी सोसायटी बस स्टँड समोर उदगीर हे आहे.