16 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे पुस्तक प्रदर्शन व विक्री स्टॉल्ससाठी नोंदणी सुरू!

16 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे पुस्तक प्रदर्शन व विक्री स्टॉल्ससाठी नोंदणी सुरू!

उदगीर: उदगीर येथे जिल्हा परिषदेच्या भव्य प्रांगणात शनिवारी दि. 23 व रविवारी दि. 24 एप्रिल 2022 रोजी 16 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात पुस्तक विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
मुंबईत धारावी येथे 1999 साली बाबुराव बागुल या थोर साहित्यिकांच्या अध्यक्षतेखाली व थोर इतिहासकार डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनापासून आजवरच्या 14 संमेलनांमध्ये पुस्तक प्रदर्शन व विक्री हे विद्रोहीचे वैशिष्ट्य राहिले आहे. साहित्य व वाङमय विषयक भुमिकेवर आधारित सांस्कृतिक परंपराच्या विविधतेेचे समर्थन, बहुभाषिकतेचा सन्मान, सनातनवादाला विरोध, व संविधानसन्मानार्थ या चतु:सुत्रीवर आधारित उदगीर येथे भरणार्‍या या 16 व्या संमेलनात हे वैशिष्ट्ये पुन्हा एकदा दिसणार आहे. लातुर जिल्ह्यातील विचारी, आंदोलनजीवी-कष्टकरी जनता पदरमोड करत पुस्तके खरेदी करण्याची फुले-शाहू-आंबेडकरी परंपरा दाखवणार आहे. या 16 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात हीच जनता पुस्तकखरेदीचा नवा उच्चांक करणार असल्याची अपेक्षा स्वागताध्यक्ष डॉ अंजुम कादरी, राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले, मुख्य निमंत्रक डॉ. मारोती कसाब यांनी व्यक्त केली आहे.
या संमेलनात ग्रंथ प्रदर्शन व विक्री साठी 15 बाय 15 चौरसफुटाचा स्टॉल चार टेबल व एक खुर्ची उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत दोन दिवसासाठी 1000. ( एक हजार ) शुल्क आकारले जाइल शुल्क विद्रोही मराठी साहित्य समेलन या नावे उस्मानाबाद जनता सहकारी बैंक , उदगीर , खाते क्रमांक A/C No. 061103700100014 ( IFSC code HDFC0COJSBL ). या खात्यात भरावे. पैसे भरल्याची पावती सतिश नाईकवाडे (मोबा. 9284089442) यांच्या व्हॉट्सॲप वर पाठवावी. प्रथम शुल्क भरून नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या पद्धतीने स्टॉल वाटप केले जातील अशी माहिती स्वागताध्यक्षा डॉ.अंजुम कादरी, राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले , मुख्य निमंत्रक डॉ.मारोती कसाब यांना दिली आहे.
Popular posts
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image
मतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन
*श्री भगवान परशुराम जन्मोत्सव घरातच साजरी करावी:-*
Image
पर्यावरण व विकास याचं साहचर्य असावं - डॉ. अरुणा खामकर
पोस्ते पोदार लर्न स्कूल सीबीएसई इथे कारवॉ फाऊंडेशन कडून वृक्षलागवड..
Image