डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती: नगर परिषदेचा उपक्रम: सलग दहा तासाचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा

 डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती: नगर परिषदेचा उपक्रम: 

सलग दहा तासाचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा


उदगीर : देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उदगीर नगर परिषदेच्या हुतात्मा स्मारक सार्वजनिक वाचनालयात विविध शाळेतील विद्यार्थ्यानी सलग दहा तास वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

उदगीर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाचक प्रेरणा दिवस पार पडला. या उपक्रमात शहरातील रामकृष्ण इंटरनॅशनल स्कुल, महेश प्राथमिक विद्यालय,अनुप कॅरिअर व दीप कॅरीयर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 

प्रारंभी ग्रंथपाल ज्ञानेश्वर पारसेवार, रामकृष्ण इंटरनॅशनल स्कुलच्या शिक्षिका अश्विनी भांगे, महेश प्राथमिक शाळेचे सचिव प्रवीण बिरादार, शिक्षक रंगनाथ होनराव, नामदेव सूर्यवंशी, ग्रंथालयीन कर्मचारी एस. एस. बिरादार, पत्रकार राम मोतीपवळे, विक्रम हलकीकर, पार्वती बिरादार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सलग दहा तास वाचन केल्याबद्दल प्रत्येक वाचकांना ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला.

       या कार्यक्रमास  प्रशासकीय अधिकारी वीरेंद्र  उळागड्डे, इंजिनीयर शुभम मटके , इंजिनीयर सिद्दिकी, संदीप कानमंदे, वैजनाथ बदनाळे, इंजिनीयर चाटे, विश्वनाथ मानसे, श्रीमती कमलाकर, प्रा. पंडित देवशेट्टे, रवींद्र टोम्पे यांच्यासह  एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणारे किरण पारसेवार, ज्ञानेश्वर चोले, शिंदे व त्यांची टीम  मोठ्या संख्येने उपस्थित होती.

टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज