युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


निलंगा : भाजपाचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसासाठी आपल्या नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांनी भाऊ गर्दी करत वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

युवा नेते


अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या, क्रिकेट, आरोग्य शिविर, किर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

       दि. ९ मार्च शनिवार रोजी सकाळी ७.३० वाजता ग्रामदेवत निळकंठेश्वर मंदीरात अभिषेक, तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे अभिवादन, पिरपाशा दर्गा, दादापीर दर्गा येथे चादर अर्पण, स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तर अंबुलगा (बु) येथे दिवसभर भव्य मोफत आरोग्य शिबीर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बतीने तालुक्यातील आरोग्य केंद्रात फळवाटप व विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तर कासार शिरसी येथे भव्य कुस्ती दंगल भरवण्यात आली. अरविंद पाटील निलंगेकर सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत जनसेवा कार्यालयात निलंगा येथे उपस्थित राहून मतदारसंघातील निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यासह लातूर जिल्ह्यातून आलेल्या भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकत्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी भाऊ गर्दी करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

        निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापारी, वकील, पत्रकार आदींनी भाऊ गर्दी करत उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

         यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे चेअरमन शेषराव ममाळे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सत्यवान धुमाळ, औराद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरसिंग बिरादार, उपसभापती शाहूराज थेटे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, ऍड. वीरभद्र स्वामी, सुमित इनानी, शासकीय ठेकेदार एन. आर. काळे, भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, गजानन देशमुख, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष आमिर पटेल, संतोष पाटील, बालाजी मोरे, जनार्धन सोमवंशी, किशार लंगोटे, मनोज कोळळे, स्वरूप धुमाळ, मधुकर माकणीकर, प्रणिता केदारे, अजित लोभे, संजय हलगरकर, माकणीचे उपसरपंच तुकाराम सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम बिराजदार,सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बंकट बिराजदार, शासकीय ठेकेदार  विजयकुमार स्वामी, बालाजी मोगरगे, संतोष पाटील, अमीर पटेल, बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे, उपसभापती लालासाहेब देशमुख, राम काळगे, विनोद सोनवणे, पंकज भालके, उपप्राचार्य प्रशांत गायकवाड, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, नागेश पाटील, उल्हास सूर्यवंशी, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, उपविभागीय अधिकारी नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, विनोद सोनवणे, अंकुश धनुरे, तम्मा माडीबोणे, शरद पेटकर, सुभाष डावरगावे, नागेंद्र पाटील, पिंटू पाटील, युवराज पवार, उपसरपंच सुधाकर चव्हाण आदीसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते चाहत्यांनी उपस्थित राहून अरविंद पाटील यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले

Popular posts
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image