विविध सामाजिक उपक्रमांनी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस निलंगा शहरात साजरा...

विविध सामाजिक उपक्रमांनी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस निलंगा शहरात साजरा...




निलंगा : मराठा आरक्षण चळवळीतील प्रमुख नेते मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस सकल मराठा समाजाच्या वतीने विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने निलंगा तालुक्यात व निलंगा शहरात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.सर्वप्रथम ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, बसस्थानक,कोर्ट, तहसील, पंचायत समिती, नगर पालिका, दादापीर दर्गा येथे वृक्षारोपण करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक हजार एक (१००१) वृक्ष वाटप करण्यात आले त्यात चिकू, केशर आंबा, डाळिंब, लिंबू या झाडांचा समावेश होता,त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने उपस्थितांना अल्पोपहार म्हणून खिचडी वाटप करण्यात आली.


यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावात वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.

टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज