उदगीर विधानसभा मतदारसंघावर सौ. उषा कांबळे यांचाच दावा, काँग्रेस कार्यकारिणीचे निवेदन

उदगीर विधानसभा मतदारसंघावर सौ. उषा कांबळे यांचाच दावा, काँग्रेस कार्यकारिणीचे निवेदन 



उदगीर : 

उदगीर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षासाठी सोडला जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ पक्षश्रेष्ठींना भेटले असून उदगीरच्या माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सौ. उषा कांबळे यांनाच उमेदवारी द्यावी. अशी मागणी केली आहे. 

लातूर येथे मराठवाड्यातील काँग्रेसचे खासदार आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने नियुक्त केलेले प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे गटनेते सतेज पाटील, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. अमित विलासराव देशमुख, सहकार महर्षी माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख, आ. धीरज देशमुख, लातूरचे खा. डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खा. वसंतराव  चव्हाण, खा. डॉ. काळे इत्यादी मान्यवरांच्या समक्ष काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने नेत्यांना उदगीर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षासाठी सोडवून घ्यावी, तसेच उदगीर विधानसभेसाठी सौ. उषा कांबळे यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी. अशी आग्रही मागणी केली आहे. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे उदगीर तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, जळकोट तालुका अध्यक्ष मारुती पांडे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीला पाटील, काँग्रेसचे उदगीर शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, आशिष पाटील, महेश धुळशेट्टे, नाना ढगे, पंचायत समितीचे माजी सदस्य बबन धनबा, माजी नगरसेवक विलास शिंदे, महबूब शेख, शिवराज पाटील, अशोक जमदाडे, ज्ञानेश्वर आपटे, धनराज दळवे पाटील, काँग्रेस युवक आघाडीचे विधानसभा अध्यक्ष अमोल कांडगिरे, विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक विनोबा पाटील गुडसूरकर, संदीप पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य माधव कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, भाकसखेडा - गंगापूर विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव, श्रीरंग कांबळे, प्रदीप उदगीरकर, अमित लांजे, गौतम सोनकांबळे, अमजद पठाण, बाबुराव जाधव, नूर पठाण, संभाजी भाले इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिलेल्या निवेदनात उदगीर विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार म्हणून सौ.उषा कांबळे यांना संधी द्यावी. अशी आग्रही मागणी ही याप्रसंगी करण्यात आली आहे.

उदगीर नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात सौ. उषा कांबळे यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबवून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. शासनाच्या अनेक योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा निश्चितपणे काँग्रेस पक्षाला होऊ शकेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य काँग्रेस प्रेमी व्यक्त करू लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक जागांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे जाळे फार मोठे आहे. त्यामुळे काँग्रेसला संधी देणे महाविकास आघाडीच्या फायद्याचे ठरणार आहे. असेही मत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.