*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*

 *चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*

*थेट सायकलवर बसून नारी शक्ती सन्मान रॅलीत ना.संजय बनसोडे यांचा शहरात फेरफटका*



*उदगीर* : शहरात सद्या चैतन्याचे वातावरण असुन शहर व तालुक्यात श्री गणेशाची स्थापणा करण्यात आली आहे. या मध्ये विविध गणेश मंडळानी सामाजिक उपक्रम राबवून लक्ष वेधून घेत आहेत. त्यातच उदगीर शहरातील शिवछत्रपती युवक गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी आयोजित केलेल्या नारी शक्ती सन्मान व महिला जनजागृती सायकल रॅलीचा क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चौबारा मार्गे रॅलीमध्ये सायकल चालवून सहभाग नोंदविला. 

या रॅलीत उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, प्रा. श्याम डावळे, मनोज पुदाले, बाळासाहेब पाटोदे, सतीश पाटील माकणीकर, प्रशांत जगताप, उदय मुंडकर, विपीन जाधव, नीता मोरे, कल्पना चौधरी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या
Popular posts
महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान.    मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम.  
इमेज
लॉयनेस क्लब गोल्ड च्या अध्यक्षपदी सौ. संगीता नेत्रगावे पाटील यांची निवड.*
इमेज
प्रभाग 8 मध्ये निर्जंतुकिकरणाची फवारणी उदगीर:
इमेज
मराठी राजभाषा दिनानिमित्त उदयगिरीत 28 फेब्रुवारीला ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकरांचे व्याख्यान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज