व्यंगचित्रकार -हळुवार मनाचा कट्टर विचारवत!

एकाच वेळी राजकारण, चित्रकला यांच्यासमवेत संगीत यांचे प्रेम जोपासणारा व जगणारा हळुवार मनाचा पण कट्टर विचारांचा नेता जगाच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो....शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त, त्यांच्या झंझावाती आणि अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तिमत्त्वाची ही ओळख... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळपास पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीच्या काळात ते कायमच वेगवेगळ्या वादांच्या केंद्रस्थानी राहिले. त्यामुळे त्यांच्याबद्दल उलट-सुलट लिहिण्या- बोलण्याच्या अनेक संधी ते स्वत:च पत्रकार आणि राजकीय, सामाजिक नेत्यांना पुरवत राहिले. आता त्यांच्या मृत्यूला एक वर्ष उलटल्यानंतर त्यांच्याबद्दल आणखी वेगळे काय लिहायचे व वाचायचे, हा प्रश्न उपस्थित झाला तरी, बाळासाहेब या व्यक्तीच्या राजकीय ओळखीपलीकडे त्यांच्या स्वभावात, वागण्या- बोलण्यात इतक्या खुब्या होत्या की, त्यांची दखल घेतल्याखेरीज त्यांच्या झंझावाती आणि अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पूर्ण होऊच शकत नाही. बाळासाहेबांचे जाहीर सभांतील बोलणे आणि वृत्तपत्रीय लिखाण दोन्ही झणझणीत आणि तिखट. त्यामुळेच अनेकांच्या कपाळावर घाम फुटायला आणि डोळ्यात पाणी तरळायचे. कुंचल्याच्या एका फटकाऱ्याने ते भल्याभल्यांना घायाळ करायचे, तसेच त्यांच्या एखाद्या वाक्याने शत्रू जायबंदीही व्हायचे. जाहीर सभेतील त्यांचे भाषण म्हणजे समोर बसलेल्या शेकडो-हजारो श्रोत्यांशी थेट संवाद वाटायचा. पण या वक्तव्यांच्या मागे खोलवर दडलेला विचार असायचा आणि एका विशिष्ट उद्देशाने व परिणामांची अपेक्षा ठेवूनच बाळासाहेब बोलत असत. हिंद महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक दल, बजरंग दल वगैरे हिंद संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अयोध्येत चालू केलेल्या कारसेवे'च्या वेळी वादग्रस्त बाबरी मशीद ढासळली आणि भारतीय राजकारणाची दिशाच बदलली. मशीद कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेत्यांचीसुद्धा ‘गाळण उडाली होती. लालकृष्ण आडवाणींसारख्या भाजपच्या 'लोहपुरुषाने सुद्धा आपली मान शरमेने खाली गेली, अशा अर्थाचे जाहीर वक्तव्य करून कारसेवकांचा तेजोभंग केला. बाकीचे नेते तर गायबच झाले. अशा वेळी बाळासाहेबांनी हे कृत्य जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल, तर मला त्यांचा अभिमान वाटतो', असे रोखठोक विधान करून खळबळ उडवून दिली. या कारसेवेसाठी महाराष्ट्रातून काही कार्यकर्ते गेले होते, हे खरे, पण त्यात शिवसैनिक किती व नक्की ते बाबरीच्या कळसावर चढले होते का, हे समजायला तेव्हा काहीच मार्ग नव्हता, पण तरीही बाळासाहेब बोलले. पण त्यांच्या या सहज वाक्याचा मोठा परिणाम झाला. एक तर हिंद पक्ष व संघटनांचे जे नेते आतापर्यंत घाबरलेले, भेदरलेले होते, त्यांना धीर आला व हळूहळू ते बिळातून बाहेर येऊ लागले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी हे कृत्य केले, त्या कारसेवकांना आपल्या पाठीशी कुणी तरी आहे, याची जाणीव होऊन धीर आला. याचाच परिणाम म्हणून आणखी दोन वर्षांत महाराष्ट्रात शिवसेना- भाजपच्या युतीला सत्ता हस्तगत करण्याइतकी शक्ती मिळाली. त्यांच्या तथाकथित बेछूट वक्तव्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे १९९५ साली शिवसेना- भाजपचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले, त्यानंतर काही दिवसांतच बाळासाहेबांनी 'सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे', असे सांगून संथ पाण्यात दगड भिरकावला. हा तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुखभंग करण्याचा प्रयत्न होता का? तशी टीका झाली. बाळासाहेबांनी त्यास कधी उत्तर दिले नाही. मात्र या त्यांच्या विधानामुळे पुढे सरकार, विशेषतः स्वत: जोशी त्यांच्या अनेक निर्णयांविषयीच्या टीकेपासून स्वत:ची निर्वेध सुटका करून घेऊ शकले! वैयक्तिक आयुष्यात ते अत्यंत भावनाप्रधान होते. त्यांच्याकडे स्वत:च्या अडी-अडचणी घेऊन येणारी सामान्य माणसे अनेक. त्यांना तिथल्या तिथे भरीव आर्थिक मदत करताना बाळासाहेब मागे-पुढे पाहात नसत. हजारो शिवसैनिकांना आणि पाठीराख्यांना ते अखेरपर्यंत पहिल्या नावाने ओळखत राहिले. त्यांच्या कुटुंबियांचीही माहिती त्यांच्या स्मरणात असे. बाळासाहेबांच्या या गुणामुळेच शिवसेनेकडून काहीही मिळाले नाही, तरी त्यांचे चाहते त्यांना भेटण्यास, त्यांचे शब्द ऐकण्यास आतुर असायचे. बाळासाहेब राजकारणी तर खरेच, पण ते उत्तम व्यंगचित्रकार होते, हे महत्त्वाचे. ते जी व्यंगचित्रे रेखाटायचे, ती त्यांच्या कुंचल्याने कागदावर उमटत असली, तरी ती आधी त्यांच्या मनात चितारली जायची. 'मी शरीराचे व्यंगचित्र काढत त्यांच्याकडे नाही. ते काम माझ्या रेषा करतात, मी व्यंगचित्र मनातल्या मनात घोळवतो, त्यांना ते त्या माणसाच्या स्वभावाचे, कारकीर्दीचे असते', असे ते सांगत. त्यामुळेच काळाच्या ओघात एकाच नेत्याचे व्यंगचित्र बदलताना दिसत राहिले. १९६६मध्ये 'गँगी गुडिया' त्यांच्या म्हणून पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधींचे व्यंगचित्र बहलीसारखे असायचे. पुढे त्यांनी बांगलादेश युद्ध जिंकले व त्या 'दुर्गा' बनल्या, तेव्हा बाळासाहेबांच्या रेषा बदलल्या. शब्द निरंकुश सत्ताधीश होण्याच्या नादात त्यांनी आणीबाणी लादली तर व त्या लोकशाहीतील 'हुकुमशहा' व्यंगचित्रकार बनल्या. आता बाळासाहेबांच्या कुंचल्याला त्यांची आणखी एक कुंचल्याने वेगळी प्रतिमा सापडली. अशी अनेक उदाहरणे. पंडित नेहरू, जॉर्ज चितारली फर्नाडिस, सर विन्स्टन चर्चिल यांची व्यंगचित्रे अशीच त्यांच्या बदलत्या स्वभावानुसार बदलत गेली. जेव्हा वय आणि आजारपण यामुळे मनात जशा रेषा उमटल्या, तशा कागदावर उतरवणे शक्य होईनासे झाले, तेव्हा त्यांनी स्वखुशीने ड्रॉइंर्गबोर्डवरचा कागद उतरवला. 'महाराष्ट्र टाइम्स वार्षिका'साठी त्यांना २००१मध्ये अर्कचित्रे काढण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी हीच अडचण सांगितली. मात्र नंतर स्वत:च पेन्सिल स्केचिंग करून 'इंकिंग'चे काम राज यांच्याकडे सोपवले. त्यांनी काढलेली व प्रसिद्ध केलेली बहधा शेवटची व्यंगचित्रे. एकाच वेळी राजकारण, चित्रकला यांच्यासमवेत संगीत यांचे प्रेम जोपासणारा व जगणारा हळुवार मनाचा पण कट्टर विचारांचा नेता जगाच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो. बाळासाहेब ठाकरे या नेत्याची हीच थोरवी.