कमालनगर : कर्नाटकातील बीदर जिल्ह्रातील, कमालनगर तालुक्यातील निडोदा प्राथमिक कृषी पतीन सहकार संघ लि. निडोदाच्या अध्यक्षपदी दयानंद बिरादार यांची बिनविरोध निवड झाली आहे. कर्नाटकातील सीमा भागातील कमालगर तालुक्यात निडोदा पी.के.पी.एस. संघ निडोदा व हल्लाळी या दोन गावांशी संलग्न असून या दोन्ही गावातून 12 संचालकांची निवड यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नुतन संचालकाची बैठक बोलाविण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी दयानंद बिरादार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निडोदा पी.के.पी.एस.संघ 32 लक्ष रु.नफ्यात असून एकूण वार्षिक उलाढाल 6 कोटी रु. आहे. 4 कोटी कर्ज वाटप व 1.5 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. निडोदा संघाच्या अध्यक्षपदी निडोदा पी.के.पी.एस.संघाच्या अध्यक्षपदी दयानंद बिरादार दयानंद बिरादार यांची निवड झाल्याबद्दल उदगीर येथील प्रसिध्द व्यापारी विजयकुमार पारसेवार यांनी त्यांचा व्यंकटरमणा ज्वेलर्स येथे सत्कार केला. यावेळी उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, लोकभारती पक्षाचे महासचिव अजित शिंदे, पत्रकार राम मोतीपवळे, रविंद्र हसरगुंडे,सूनील हवा, विक्रम हलकीकर, अभय पारसेवार यांची उपस्थिती होती.