स्त्रियांचा सन्मान करणारेच खरे शिवरायांचे अनुयायी : दिशा पिंकी शेख उदगीर : छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणवून घेणा-यांची संख्या कमी नाही परंतु स्त्रियांचा सन्मान करणारेच ख-या अर्थाने शिवरायांचे अनुयायी असू शकतात असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले. उदगीर येथील सार्वजनीक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने नगर परिषदेसमोरील प्रांगणात दिशा पिंकी शेख यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील अठरा पगड जातींना सोबत घेवून स्वराज्याचे स्वप्न पाहीले व ते पूर्ण केले. आज समाजात जाती जातीत, धर्माधर्मात भेद करणारी मंडळी वाढत आहे. जाती धर्माच्या पलीकउे जावून देशाच विचार करणाराच खरा देशभक्त असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार चालविताना आपल्या आईचा सन्मान करून समस्त स्त्री जातीचा सन्मान केला असल्याचे सांगितले. आज मात्र आपली आई, बहीण, मुलगी, पुरूषी वर्चस्वाखाली दबून छळली जात आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वरचेवरवाढत चालले आहे. महिलंाना अजूनही वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही अशी खंत व्यक्त करीत जोपर्यंत स्त्रीयांची वैचारिक गुलामगिरी संपणार नाही तोपर्यंत हा शिवरायाचा महाराष्ट्र होणार नाही असे शेख यावेळी म्हणाल्या. सार्वजनीक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दोन दिवस कलामहोत्सव पार पडले. या कलामहोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वियज निटूरे व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नरेंद्र कठारे, नीता मोरे, काजोल मिरजगावे, संगीता नेत्रगावे, स्वप्नील पकोळे, सुनील कोळी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीता मोरे यांनी केले. पाहूण्यांचा परिचय अनिता यलमटे यांनी करून दिला.
Publisher Information
Contact
nilsamachar@gmail.com
9403012041
Brahman galli udgir
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn