जिल्हा परिषद आशा सेविकांच्या पाठीशी खंबीर : राहुल केंद्रे उदगीर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची सेवा पुरविण्याचे काम आशा सेविका प्रामाणिकपणे करीत आहेत, या आशा सेविकांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी लातूर जिल्हा परिषद खंबीरपणे उभी आहे असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले. उदगीर येथील सामान्य रुग्णालयात आशा डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केंद्रे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड, पंचायत समिती सभापती विजयकुमार पाटील, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, बापूराव राठोड, पंडितराव सूर्यवंशी ,दत्ता पाटील उपस्थित होते. पूढे बोलताना राहुल केंद्रे म्हणाले, आशा वर्कर चे काम शेवटच्या माणसापर्यंत जाऊन योजना पोहचवण्याचा काम असो कि जनसामान्यांच्या आरोग्याच्या समस्या असून किंवा शासनाने निर्माण केलेले धोरण असो ते याच तंतोतंत पालन करून जनसामान्यांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी मेहनत घेत असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून या आशा वर्कर च्या कामाचा गौरव केला आहे. आशा वर्करचे कार्य उल्लेखनीय असून येणाऱ्या काळात आशा वर्कर यांना शासनाच्या नियमित सेवेत समावेश करावा असा ठराव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठवू असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार, सामान्य रुग्णालयाचे डॉ. दत्तात्रय पवार यांच्यासह आशा वर्कर मोठया संख्येनी उपस्थित होत्या.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही