उदगीरात फूटबॉल स्पर्धेचे उद्घाटन उदगीर : येथील कै. संभाजी पाटील प्रतिष्ठान व हॉनेस्ट ग्रुप उदगीर च्या वतीने उदगीर फुटबॉल लीग ऑल इंडिया या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, महेश भंडे, रोटरी क्लबच्या सचिव मंगला विश्वनाथे, नगरसेवक फैयाज शेख, संतोष फुलारी, विशाल तोंडचिरकर, देविदास पाटील, सलीम परकोटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्याधिकारी भारत राठोड यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळण्याचे आवाहन करीत यश मिळविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून खेळल्यास यश निश्चितच मिळेल असे मत व्यक्त केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी खेळाचे वातावरण टिकण्यासाठी असे खेळ आवश्यक असल्याचे सांगत उदगीरच्या मातीने अनेक मोठे खेळाडू दिले असल्याचे सांगितले. या स्पर्धा तीन दिवस चालणार असून या स्पर्धेसाठी देविदास पाटील, इफतेखार शेख, परवेज कादरी, इस्माईल शेख, बहोद्दीन जहागीरदार, इब्राहिम कुरेशी, आसिफ फारुखी, याकूब पटेल, इमाम हासमी, खाज चौधरी, उबेड हाश्मी, डायमी मुजाहेड , बयाज शेख हे पुढाकार घेत आहेत.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज