<no title>मातृभूमीचे छञपती शिवरायाना अनोखे अभिवादन ! उदगीर, येथील मातृभूमी महाविद्यालयाच्या वतीने नगरपरीषदेच्या सहकार्याने छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीनंतर मिरवणूक मार्गाची स्वच्छता करत अभिवादन करण्यात आले. स्वच्छता उपक्रमाचे उद्घाटन छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तूरे ,प्राचार्य उषा कुलकर्णी, सुधीर पाटील ,संजय राठोड, गणेश कुलकर्णी, डॉ. दत्ता पाटील यांची उपस्थिती होती .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मोठी मिरवणूक निघते मिरवणुकी वेळी शहरातील विविध सामाजिक संस्था संघटना विविध पक्ष शिवप्रेमी, शिवभक्तासाठी अल्पोपाहार ,पाणी ,शरबत, यांची व्यवस्था करतात दरम्यान रस्त्यावर पत्रावळी प्लॅस्टिक व कागदाचे ग्लास,कागद ,फुले याचा कचरा मिरवणुकीच्या मार्गावर पडतो .मिरवणूकीच्या मार्गाची स्वच्छता करून मातृभूमी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मातृभूमी नर्सिंग स्कूल ,कस्तुराबाई नर्सिंग स्कूल यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यावर्धिनी हायस्कूल, शहर पोलीस स्टेशन , चौबारा , हनुमान कट्टा ,छत्रपती शिवाजी महाराज चौक या रॅलीच्या मार्गाची स्वच्छता करत ७गाड्या कचरा गोळाकरत विद्यार्थ्यांनी सामाजिकता जोपासली .यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बिभीषण मद्येवाड , स्वच्छता निरिक्षक रफियोद्दीन शेख ,प्रा सय्यद उस्ताद, प्रा किशोर हरणे ,प्रा अश्विनी देशमुख ,प्रा रणजित मोरे , ग्रंथपाल उषा सताळकर ,प्रा रेखा रणक्षत्रे प्रा मीना केंद्रे, प्रा स्वाती खोंडे ,दयांनद टाके ,विवेक देवर्षे ,प्रा आरती गवळी , प्र शितल कदम ,सतिश सोनकांबळे ,आदीनी स्वच्छता उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image