विद्यार्थ्यांनी अडचणींवर मात करून प्रशासकीय अधिकारी व्हावेःरामदास पाटील स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळते. कलागुणांनाबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी केली.चांगले विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये येणे काळाची गरज आहे.विद्यार्थ्यांनी जीवनावर प्रेम केले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे कारण अभ्यासातूनच भविष्य घडते.विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात केली तरच भविष्य उज्ज्वल होते असे मार्गदर्शन श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी नगर परिषद हिगोंलीचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव उमेश पाटील देवणीकर हे उपस्थित होते. याप्रसंगी विचारमंचावर संस्थेचे अध्यक्ष अँड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर,उपाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, सदस्य विष्णूदास सारडा,सौ.मनीषा देशमुख, साईनाथ चिमेगावे,रमाकांत चटनाळे,दिलीप आलमकेरे,अशोक कापसे पत्रकार राम मोतीपवळे,विक्रम हालकीकर,बसवेश्वर डावळे ,महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ.एस.डी.लोहारे,उपप्राचार्य डॉ. ए.ए.काळगापुरे विद्यार्थी संसदेचे प्रभारी प्राध्यापक प्रा.डॉ. म.ई.तंगावार आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना रामदास पाटील म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवावे.स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द आणि चिकाटी असावी लागते.सराव,सातत्य आणि वेळवर अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी वेळेचा सद्पयोग केला पाहिजे. वेळ गेल्यावर साधा कोतवाल ही होता येत नाही. विद्यार्थ्यांनी तरूणाई आनंद घेतला पाहिजेच परंतु परिस्थितीचे ही आत्मभान असले पाहिजे असे मार्गदर्शन यावेळी केले. यावेळी स्नेहसंमेलनात विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागतगीताने स्वागत प्रा.डॉ अनवले,प्रा.जोगेंद्र सोमवंशी आणि संच यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस.डी.लोहारे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा.धनराज बंडे यांनी करून दिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.प्रतिक्षा लोहकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.मनोहर भालके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
• विक्रम लक्ष्मीकांत हलकीकर

*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
• विक्रम लक्ष्मीकांत हलकीकर

उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
• विक्रम लक्ष्मीकांत हलकीकर
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
• विक्रम लक्ष्मीकांत हलकीकर

'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
• विक्रम लक्ष्मीकांत हलकीकर

Publisher Information
Contact
nilsamachar@gmail.com
9403012041
Brahman galli udgir
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn
addComments
टिप्पणी पोस्ट करा