लोणीमोड येथे पालात राहणाऱ्या गरीबांना विश्व हिन्दू परिषदेचा मदतीचा हात लातूर /प्रतिनिधी :कोरोना व्हायरसशी लढताना संपूर्ण देश लॉकडाउन व देशभर संचारबंदी असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोणीमोड येथे पालात राहणाऱ्या गोरगरीब लोकांना विश्व हिन्दू परिषदेने समाजिक संघटन म्हणून आपली नैतिक जाबदारीची जाण ठेवत मदत केली . या वस्तीत एकूण 26 कुटुंब आहेत. या कुंटूबाना 10 दिवस पुरेल इतके अन्नधान्य देण्यात आले .प्रत्येक कुटूंबाला 10 किलो गहू, 15 किलो तांदूळ, 1 किलो दाळ, दोन तेल पॉकेट, जिरे, मिरची पावडर, मीठ वाटप करण्यात आले. यावेळी विहीपचे विभाग संघटन मंत्री संतोष कुलकर्णी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिरसाट , विशेष व्यक्ती संपर्क प्रमुख अजय दंडवते, विश्व हिंदू परिषद लातुर मंत्री विलास खिंडे, उदगीर प्रखंड मंत्री पांडुरंग फड, गणेश पाटील, निखिल पाटील, अरुण देगलवाडे, प्रमोद पाटील हे उपस्थित होते. विश्व हिंदू परिषद समोर असली तरी, आमच्यावर विश्वास ठेऊन, दान देणार दाते यात खरे हिरो आहेत. कुठल्याही प्रसिद्धिची अपेक्षा न करता ते आम्हास मद्त करतात. या सर्व हितचिंतकाचे विश्व हिन्दू परिषदेच्या वतीने आभार मानण्यात आले .
Publisher Information
Contact
nilsamachar@gmail.com
9403012041
Brahman galli udgir
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn