जिल्हा परिषद आपल्या सोबत, नागरिकांनो स्वतःची काळजी घ्या - जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे लातूर / उदगीर (प्रतिनिधी) सगळे ठिक हाव का..? म्हणत प्रत्येक घराघरात आशाताई व इतर आरोग्य कर्मचारी नागरिकांची विचारपुस करताना पहावयास मिळत आहेत. तसेच, स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे आरोग्य केंद्रावर भेट देत परिस्थितीची पाहणी करत आहेत. दरम्याण, कूठे अनियमितता दिसली तर थेट कारवाई करत आहेत. अशात, नागरिकांनीही स्वतःची व परिवाराची दक्षता घेणे गरजेचे आहे. येणारे काही दिवस आपल्यासाठी खुप महत्वाचे आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात गेलेली जवळपास सगळी मंडळी आता गावात दाखल झाली आहेत. परंतु, त्यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण खूपच संशयीत आहे. त्यामूळे बाहेरुन आलेल्या सर्वांनी आरोग्य कर्मचारी, आशाताई व इतर सर्व यंत्रणांना सहकार्य करावे, विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आलेल्या तसेच हातावर शिक्का मारलेल्या व्यक्तीनीं घालून दिलेल्या नियमांचे पालण करावे, जेणेकरुन संसर्ग होण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही. असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी केले आहे. तसेच, सोशल मिडीयावरुन अफवा करु नका, संचारबंदी सुरु असल्याने घरात राहून पोलिसांना सहकार्य करा, कूठल्याही परिस्थितीत एकत्रित येण्याचे टाळा, आपले हात स्वच्छ धुवा, गरजेच्या ठिकाणी मास्क किंवा रुमालचा वापर करा, असे जनतेला आवाहन करत जिल्हा परिषद अध्यक्षांनी सर्व ग्रामसेवकांना व जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपापल्या सज्जावर पूर्णवेळ उपास्थित राहण्यास सांगीतले आहे. तसा, अधिकृत निर्णय त्यांना देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. शिवाय, प्रत्येक ग्रामपंचायतीने ऍन्टीव्हायरस लिक्वीडची एखादी फवारणी गावात करावी, सरपंच व कर्मचारी वर्गानी गावात राहून जनतेला धीर द्यावा, लोकांना सेनिटायझर्स, मास्कचे महत्व पटवून द्यावे, असेही सुचित करत कर्मचारी वर्गानी हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. चौकट क्र. १ आपण आपल्या परिवाराची व स्वतःची काळजी करणे गरजेचे आहे. गंभीर व्हा, कृपया सहज घेऊ नका..! आलेले संकट आपण समजता त्यापेक्षा खूप मोठे आहे. १५ एप्रिल पर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य सरकार आणि जिल्हा परिषेदेचा आरोग्य विभाग आपल्यासाठीच काम करत आहे. शासनाला व प्रशासनाला सहकार्य करा. आपण आहोत तर जग आहे, आणि कुटूंब आहे. राहूल केंद्रे अध्यक्ष, जिल्हा परिषद लातुर