प्रभाग ७ मध्ये मनोज पुदाले यांच्या वतीने नागरिकांना सॅनिटायझर्सचे वाटप: निर्जंतुकिकरणाची फवारणी उदगीर (ता.प्र.) सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले असून याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रभाग क्र. ७ मध्ये नगरसेवक मनोज पुदाले यांच्या पुढाकारातून नागरिकांना सॅनिटायझर्सचे वाटप व निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते नागरिकांना सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, प्रभागाचे नगरसेवक मनोज पुदाले उपस्थित होते. भाजीमंडई, जिजामाता भाजीमंडई, पनचक्की मस्जिद, सात सैलानी, उदय चित्रमंदिर, बसवनकेरी गल्ली, हनुमान रोड, पुदाले चौक, लक्ष्मीनारायण मंदिर, बागवान गल्ली, मलगे गल्ली, आठाणे गल्ली, कमळीमठ गल्ली, नगरेश्वर मंदिर, चौबारा आदी सह संपूर्ण प्रभागात ही निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. यावेळी फवारणीसाठी श्रीकांत पांढरे, रमेश धावडे व सुरेश स्वामी , अमित कंठे, प्रशांत कंठे सह न. प. स्वच्छता कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. यावेळी नगरसेवक पुदाले यांनी नागरिकांनी घराबाहेर न येता आपल्या घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज