भाजी विक्रेत्यांना मास्क व हँड ग्लोजचे वाटप : मनोज पुदाले यांचा पुढाकार उदगीर: येथील नगरसेवक मनोज पुदाले यांच्या पुढाकारातून शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना कोरोनापासून बचावासाठी हँड ग्लोज व मास्कचे वाटप करण्यात आले. शहरात सोशल डिस्टन्सइंगचा प्रयोग व त्या साठीची मार्किंग नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. ही मार्किंग व्यवस्थित कार्यरत आहे की नाही याची पाहणी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, नगरसेवक मनोज पुदाले, अॅड . दत्ताजी पाटील यांनी केली . यावेळी नगरसेवक मनोज पुदाले यांच्या वतीने सर्व भाजीपाला विक्रीते यांना हॅन्ड ग्लोज व मास्कचे वाटप करण्यात आले . या वाटप प्रसंगी मार्किंग करून त्यांना समजून सांगावं लागत होतं सोशल डिस्टन्स ठेवणे किती गरजेचे आहे. यासाठी पहाटे पाच ते सकाळी नऊ पर्यंत भाजीपाला विक्रेते व मेडिकल स्टोअर्स त्यां सर्वांना समजून सांगून सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी विनंती करण्यात आले. भाजीपाला विक्रेत्यांना घ्यावयाच्या काळजी संबंधी सूचनाही यावेळी करण्यात नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व मुख्याधिकारी राठोड यांनी दिल्या.


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image