*खाऊगल्लीतुन चटकदार व खमंग पदार्थाची मेजवानी* *आर्य वैश्य वासवी महिला मंडळाच्या वतीने विविध पुरस्काराचे वितरण* *उदगीर:* येथील आर्य वैश्य वासवी महिला मंडळाच्या वतीने गृहिणींतील पाककलेला वावमिळवुन देण्यासाठी फन फेअर (खावुगल्ली) ठेवण्यात आली होती. यात तीस पदार्थांचे स्टाल महिलांनी लावले होते.चटकदार आणि खमंग पदार्थांची चव जवळपास हजार महिलांनी घेतली. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र कुटुंब पद्धती पुरस्कार, व्यावसायिक महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुजाता पंदिलवार होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अनिता येलमटे, सौ.कल्पना मेंगशेट्टे उपस्थित होते. यावेळी एकत्र कुटुंब पद्धती पुरस्कार सौ.शांताबाई सुभाष कलकोटे, सौ.कमलबाई दिनकर महाजन, ग.भा‌.सुमनबाई पंदिलवार, ग.भा. शांताबाई कोटलवार ग.भा.ल‌क्ष्मीबाई मारमवार ग.भा.चंद्रकलाबाई पारसेवार याना तर व्यावसायिक महिला पुरस्कार सौ.स्वाती बालाजी बच्चेवार,सौ.प्रिती सुनिल कवटिकवार,सौ.अरूणा शरद राजुरवार, सौ.निता गबाळे पारसेवार , ग.भा.रोहिणी पारसेवार यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.स्वाती पांपटीवार यांनी केले. स्वाती देबडवार यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमासाठीसौ.शुभांगी वट्टमवार,सौ राधिका वट्टमवार,सौ.मनिषा पारसेवार, सौ.विनिता मरेवार, सुहासिनी सुरशेटवार, दिप्ती मलगे, संपूर्णा पारसेवार, ज्योती चिद्रेवार, प्रिया कलकोटे, श्रद्धा महाजन, पल्लवी पोलावार व सपना गादेवार यांनी पुढाकार घेतला.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image