संचारबंदीच्या नियमांचे जनतेनी तंतोतंत पालन करावे : उपविभागीय अधिकारी मेगशेट्टी उदगीर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने संचारबंदी लागू केली असून कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन घराबाहेर न पडता संचारबंदीच्या नियमाचे पालन करावे अन्यथा कठोर कार्यवाही करण्याची वेळ येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी दिला आहे. प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असताना उदगीर शहरातील काही टवाळखोर हे विनाकारण दुचाकी वाहणावरून बिनबोभाट बाहेर फिरत आहेत. लोकांना कितीही सांगितले तरी नागरिक काहीतरी निमित्त सांगून रस्त्यावर येत आहेत. शहरात सर्व अत्यावश्यक सुविधा कायम पुरविण्यात येणार असताना देखील अन्नधान्य खरेदी, मेडिकलच्या नावावर लोक बाहेर येत असल्याने प्रशासनाला कडक भूमिका घ्यायची वेळ येऊ देऊ नका असे आवाहन करीत जनतेनी प्रशासनास सहकार्य करावे व विनाकारण संचारबंदी काळात बाहेर फिरु नये असेही सांगितले. दि. २८ मार्चपासून भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते याना जिल्हा परिषदेच्या प्रशालेच्या मैदानात जागा देण्यात येणार असून नागरिकांनी गर्दी न करता याच ठिकाणी येऊन भाजीपाला व फळे खरेदी करावीत असे आवाहनही उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी केले आहे.
Popular posts
*मजविपच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न*
• विक्रम हलकीकर

*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
• विक्रम हलकीकर
महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान. मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम.
• विक्रम हलकीकर
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
• विक्रम हलकीकर
मराठवाडा जनता विकास परिषद उदगीर तर्फे मुख्यमंत्री निधी 55555 रुपयाची मदत
• विक्रम हलकीकर
Publisher Information
Contact
nilsamachar@gmail.com
9403012041
Brahman galli udgir
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn