अनाधिकृतरित्या जिल्हयात येणाऱ्या नागरिकांवर कारवाई पोलीस विभागाकडून गुन्हे दाखल करण्याबरोबरच प्रतिव्यक्ती 2 हजाराच्या दंडाची तरतूद

अनाधिकृतरित्या जिल्हयात येणाऱ्या नागरिकांवर कारवाई
पोलीस विभागाकडून गुन्हे दाखल करण्याबरोबरच प्रतिव्यक्ती 2 हजाराच्या दंडाची तरतूद
लातूर:- 
शासन पत्रकान्वये शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे.त्या अन्वये जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्हयांच्या हद्दी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना (कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनधिकृतरित्या जिल्हयात प्रवेश करणाऱ्या नागरीकांमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. जिल्हयात अनधिकृत प्रवेश प्रतिबंध करणेसाठी प्रत्येक गावात अँन्टी कोरोना फोर्स (ए.सी.एफ.) स्थापन करुन गावात येणाऱ्या/जाणाऱ्या नागरिकांची विचारपूस करण्यात येत आहे.तरीसुध्दा काही लोक अनधिकृतरित्या छुप्या मार्गाचा अवलंब करुन जिल्हयात येत असून यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढयाची शक्यता टाळता येत नाही.
जिल्हयात कोरोना (कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून लातूर जिल्हयात इतर जिल्हयातून अनधिकृतरित्या प्रवेश केलेल्या व यापुढे येणाऱ्या नागरिकांवर खालील प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
अनधिकृत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine) करण्यात यावे. जिल्हयात अनधिकृत प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,2005 चे कलम 51 मधील तरतुदीनुसार रु.2000/- इतके दंड संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी वसूल करुन जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीत जमा करावे.अशा जिल्हयात अनधिकृत प्रवेश करणाऱ्या नागरिकांविरुध्द पोलीस विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात यावे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51,55 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम,2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे ही सूचित केले आहे.


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image