मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवदांपत्य ने दिले 25 हजाराचा निधी .

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवदांपत्य ने दिले 25 हजाराचा निधी .


निलंगा:-  तालुक्यातील शिऊर येथील नवविवाहित दाम्पत्याने आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साध्या पद्धतीने घरच्या घरी विवाहबद्ध  झाले . त्यानंतर या नवदाम्पत्य ने निलंगा येथे येऊन येथील उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी साठी म्हणून 25 हजारांचा धनादेश सुपूर्द केला .
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदी व जमावबंदी आदेशामुळे निलंगा तालुक्यातील शिऊर येथील दिनकर बिराजदार यांचे सुपुत्र विष्णू व उदगीर तालुक्यातील गणेशवाडी चे नरसिंग डोंबाळे यांची कन्या मैनाबाई  यांचा आज रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिऊर येथे  घरच्या घरी साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला . कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक बांधिलकी म्हणून लग्नात खर्च होणारी रक्कम  विष्णू व मैनाबाई  या नव दांपत्याने बोहल्यावरून खाली उतरताच थेट निलंगा येथे येऊन उप जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार गणेश जाधव यांची भेट  घेतली व त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी साठी म्हणून पंचवीस हजाराचा धनादेश सुपूर्द केला। . यावेळी नवरदेवाचे वडील दिनकर बिराजदार ,निलंगा नगर परिषदेचे माजी सभापती गोविंदराव शिंगाडे, शिऊरचे माजी उपसरपंच अरुण अष्टुरे,  बसवराज बिराजदार, राजकुमार सोमवंशी आदी उपस्थित होते  .
यापूर्वी  नवरदेवाचे वडील दिनकर बिराजदार यांनी या विवाहानिमित्त आयोजित जेवणाचा कार्यक्रम रद्द करून व लग्नातील थाटमाट, बडेजाव या अवास्तव खर्चाला फाटा  दिला व यावर होणारा खर्च गावातील स्वस्त धान्य दुकानाच्या 370 लाभार्थ्यांना तीन महिन्याचे राशन मोफत देण्याचे जाहीर  केले व त्यातील एप्रिल महिन्याचे 108 क्विंटल धान्याचे मोफत वाटप करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे .