रामदास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य: सुमठाणा येथे रक्तदान शिबीर 28 जणांचे रक्तदान

रामदास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य: सुमठाणा येथे रक्तदान शिबीर
28 जणांचे रक्तदान
उदगीर : तालुक्यातील सुमठाणा येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरात 28 जणांनी रक्तदान केले. यावेळी सरपंच दैवशाला कबनुरे, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग पाटील, पोलीस पाटील उत्तम पाटील, संभाजी पाटील प्रतिष्ठाणचे अध्यक्ष देविदास पाटील उपस्थित होते.
उदगीर तालुक्यातील सुमठाणा येथील कै. संभाजी पाटील प्रतिष्ठान च्या वतीने गावातील सुपुत्र तथा हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या लॉकडाऊन च्या काळात सामाजिक अंतर राखत हे शिबिर घेण्यात आले. 
कोरोना आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले असून वाढदिवस असतानादेखील मुख्याधिकारी रामदास पाटील हे आपल्या मुख्यालयी कामगिरीवर कार्यरत आहेत.
या शिबीरासाठी आयोजक देविदास पाटील,मनोहर पाटील, बापूराव मांजरे, गिरीधर पाटील, बापुराव बिरादार, अविनाश बिरादार, बजरंग पाटील,शरद बिरादार, लक्ष्मन पाटील,जयराम कालोजी, तुकाराम बरूरे, महेश कबनुरे, गोविन्द पाटिल, संदीप बिरादार, दिपक पाटील, राम पवार, अंतेश्वर शेटकार, रामदास कबनुरे, बबलू बरूरे यांनी पुढाकार घेतला.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज