मराठवाडा जनता विकास परिषद उदगीर तर्फे मुख्यमंत्री निधी 55555 रुपयाची मदत

मराठवाडा जनता विकास परिषद उदगीर तर्फे मुख्यमंत्री निधी 55555 रुपयाची मदत .
उदगीर: कोरोना आजाराने देश व राज्यात थैमान घातले असून अशा परिस्थितीत राज्य सरकारला मदत म्हणून मराठवाडा जनता विकास परिषद शाखा उदगीर च्या वतीने 55555 रुपयाचा निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी covid-19 साठी अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, सचिव प्रा एस. एस. पाटील, यांनी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे सुपूर्त केला. मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबाद चे अध्यक्ष डॉ व्यंकटेश काब्दे, यांच्या सूचनेनुसार डॉ. रामप्रसाद लखोटिया, प्रा. डॉ. अनिल भिकाने, प्रा. एस. एस .पाटील, प्रदीप बेद्रे , प्रा. डॉ हणमंत कुलकर्णी, विजय चिल्लरगे, डॉ. बी .आर .चव्हाण, प्रा बाबुराव माशाळ कर, डॉ ए .एम . पाटील, प्रा ए .आर. पाटील, प्रा प्रवीण जाहूरे, प्रा माधव खताळ, प्रा ए.जी. कुलकर्णी, जी. के. कांबळे, विश्वनाथ बिरादार, डॉ प्रकाश देशपांडे, प्रा सोमेश्वर रोडगे, संजय मूडपे, प्रा. डॉ डी .आर .होनराव, विलास पानगावकर, दीपक जोशी, प्रा बी. एन. गायकवाड , प्रा डॉ सुनिता लोहारे , प्रा डॉ संजय शिंदे, प्रा.डॉ. मुकेश कुलकर्णी, प्रा सी.एम. भद्रे, अरविंद पत्की , विवेक होळसंबरे, दीपक बलसुरकर, माधव कल्याणकर, राजेश अंबरखाने, प्रा प्रसाद जालनापूरकर , मच्छिंद्र कामंत, ऍड. रमाकांत पाटील, शिवराज कडगे यांनी निधी संकलनासाठी मदत केली विकास प्रश्नाविषयी आग्रही भूमिका घेणारी व सामाजिक बांधिलकी जपणारी परिषद असून नागरिकांनी घरी राहावे , सुरक्षित रहावे आणि शासनाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image