मलकापूर ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता घरातच थांबावे सिद्धेश्वर पाटील उदगीर (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेने अनावश्यकरीत्या घराच्या बाहेर न पडता घरातच थांबून कोरोना रोगापासून बचाव करावा असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा ग्रामपंचायतचे उपसरपंच सिद्धेश्वर पाटील यांनी केले आहे मलकापूर ग्रामपंचायतच्या वतीने गावात व नवीन वसाहत भागात कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ट्रॅक्टरद्वारे फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत असून नागरिकांना मास्क व कोरोना रोगा बद्दलचे माहितीपत्रक वाटण्यात आले , गेले दोन दिवसा पासून मलकापूर ग्रामपंचायत जुने गाव पूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आली असून सध्या नवीन वर्षात एसटी कॉलनी, शिवनगर ,अनुसया नगर, क्रांतीनगर, पांचाळ कॉलनी आदी भागात स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे फवारणी करण्यात आली याचबरोबर विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेने घ्यावयाची काळजी या माहिती पत्रकाचे वाटप सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले त्याचबरोबर गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी निळकंठ पटवारी लिपिक शिवराज ब्रम्हणा ,अनिल भालेराव, सय्यद अहमद, शेख समद ,कालीसिंग पवार तसेच स्वच्छता विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने संचारबंदी लागू केली आहेत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे आव्हान सिद्धेश्वर पाटील यांनी केली आहे --------------------------------------
Popular posts
मुठभर धान्य व एक रुपया मोहिमेला प्रारंभ : 16 वे विद्रोही साहित्य संमेलन
• विक्रम हलकीकर

उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
• विक्रम हलकीकर

साहित्य संमेलनासाठी सायकल प्रचार फेरी नळगीर मध्ये
• विक्रम हलकीकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
• विक्रम हलकीकर
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
• विक्रम हलकीकर

Publisher Information
Contact
nilsamachar@gmail.com
9403012041
Brahman galli udgir
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn