साथरोग निदान प्रयोगशाळेत प्रत्येक दिवशी 90 व्यक्तींच्या स्वॅबची दोन पाळीमध्ये मध्ये तपासणी होणार

साथरोग निदान प्रयोगशाळेत प्रत्येक दिवशी 90 व्यक्तींच्या स्वॅबची दोन पाळीमध्ये मध्ये तपासणी होणार


* या प्रयोगशाळेत आवश्यकता भासल्यास तीन शिफ्टमध्ये कामकाज होणार
*या प्रयोगशाळेत लातूर व बीड जिल्ह्यातील व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी होणार
* पालकमंत्री अमित देशमुख यांच्या पुढाकारातून लातूरमध्ये ही प्रयोगशाळा सुरू


लातूर,:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 25 एप्रिल 2020 रोजी विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळा (साथरोग निदान प्रयोगशाळा) कार्यान्वित झाली असुन एकुण 3 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असुन तिन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 
या प्रयोगशाळेत प्रत्येक दिवशी एकुण 90 व्यक्तींच्या स्वॅबची दोन पाळीमध्ये (Two Shift) मध्ये तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास तीन पाळीमध्ये सुध्दा तपासणी करण्यात येईल. व तपासणी केल्यानंतर 6 तासामध्ये अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर यांनी दिली आहे.
 ही प्रयोगशाळेस अत्यंत कमी वेळामध्ये मान्यता मिळुन कमी वेळेत कार्यान्वित होणारी महाराष्ट्रातील पहिलीच प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा कार्यान्वित होण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केल्यामुळे अत्यंत कमी वेळामध्ये प्रयोगशाळा कार्यान्वित झाली. या प्रयोगशाळेमध्ये लातुर व बीड जिल्हयातील व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात येणार आहे.
 या प्रयोगशाळेमधील यंत्रसामुग्री व उपकरणे अत्याधुनिक स्वरुपाची असल्यामुळे भविष्यात सर्व प्रकारच्या विषाणुचे निदान करण्यात येणार आहे. जसे की, स्वाईन फल्यु, डेंग्यु, चिकनगुनिया. ही प्रयोगशाळा लातुर मध्ये कार्यान्वित झाल्यामुळे अहवाल वेळेत प्राप्त होतील व अहवाल प्राप्त होण्याची प्रतिक्षा करावी लागणार नाही. अहवाल वेळेत प्राप्त झाल्यास रुग्णांवर वेळेत उपचार करण्यास मदत होईल. आज दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथील 26 डॉक्टर्स, परिचर्या व इतर व्यक्ती, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ६ व लातुर जिल्हयातील इतर १ व्यक्तींची अशा एकुण 33 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी आज या प्रयोगशाळेत होणार आहे. 
ही प्रयोगशाळा कर्यान्वित करण्यासाठी डॉ. विजय चिंचोलकर सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग यांनी वेळोवेळी संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई व सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई, आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपुर, भारतीय वैद्यकीय संशोधन परीषद (ICMR) नवी दिल्ली येथील कार्यालयात वेळोवेळी पाठपुरावा केला. डॉ. विजय चिंचोलकर यांची प्रयोगशाळेचे प्रभारी म्हणुन नेमणूक करण्यात आली असुन यापुढे या प्रयोगशाळेचे कामकाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे, अशी माहिती डॉ. गिरीष ठाकुर अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी दिली. 


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही