आपत्ती व्यवस्थापन समितीला लॉयन्स नेत्र रुग्णालयाची मदत

आपत्ती व्यवस्थापन समितीला लॉयन्स नेत्र रुग्णालयाची मदत 
उदगीर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉक डाऊन लागू केल्याने गरिबांची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहणास साद देत उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाने प्रशासनाने स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीला अन्नधान्याचे किट देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.
सध्या संपूर्ण देशात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे हातावर काम करून खाणारे गरीब, मजूर उपाशी राहू नये यासाठी उदगीर तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तू चे तिकीट स्वरूपात मदत करण्याचे आव्हान सामाजिक सेवाभावी संस्था दानशूरांना करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आपल्या उदगीर शहरा चे नाव गेल्या १४ वर्षापासून सातासमुद्रापार घेऊन गेलेले उदयगीरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय याने उदगीर तालुका आपत्ती व्यवस्थापन च्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे गहू तांदूळ तुरडाळ इ.साहित्याचे ५१ कीट उदगीर तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाला सुपूर्त केले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मंडळाधिकारी शंकर जाधव,उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया,महेश बसपुरे,प्रदीप बेद्रे,प्रवीण मुंदडा,ईश्वर प्रसाद बाहेती, सुरेश देबडवार,रमेश मुक्कावार, बालाजी आदेपा, दिपक जोशी, भास्कर मांगुळकर यांच्यासह लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे पदाधिकारी सदस्य व कर्मचारी सुरेश तिवाडी, वैजनाथ नारंगवाडे, रवी जावळे आदी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज