धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मोफत जेवण व अन्नधान्य वाटपाचे उद्घाटन

धीरज देशमुख यांच्या वाढदिसानिमित्त लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मोफत जेवण व अन्नधान्य वाटपाचे उद्घाटन
उदगीर : आपल्या देशातील विविध राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे, कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी केद्र व राज्य शासनाने लाॅकडाऊनची घोषणा केल्यामुळे विविध प्रवर्गातील नागरिकांना रोजच्या अन्नासाठी अडचणी निर्माण होत आहेत. हे लक्षात घेवून उदगीर येथील लातूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विजय निटुरे यांच्या मार्फत धीरज देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोर गरीब, निर्वासित बेघर, परराज्यातील लोक, विद्यार्थी यांच्यासाठी अन्नधान्य वाटपाचे उद्घाटन तसेच मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
या अडचणीच्या काळात कोणीही उपाशी पोटी राहून नये त्यांच्यासाठी जेवणाची व अन्नधान्याची व्यवस्था केली आहे. याचा लाभ सर्व स्तरातील अडचणीत असलेल्या नागरिकांनी घ्यावा तसेच घाबरू नका, स्वतःची काळजी घ्या, कोरोनापासून स्वतःचा व आपल्या कुटुंबीयांचा बचाव करा, घराबाहेर पडू नका, कुणालाही आम्ही उपाशी पोटी राहू देणार असे प्रतिपादन लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. 
मोफत भोजन व अन्नधान्य वाटपाचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, कल्याण पाटील, मंजूरखान पठाण ,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे , अमोल कांडगिरे,पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सुभाष धनुरे, नगरसेवक शेख मेहबुब, श्रीरंग कांबळे, मल्लिकार्जुन कानमंदे, अनिल मुदाळे, बाबुराव समगे, राजू हुडगे, अशोक मुळे, शशिकांत बनसोडे, नरसिंग शिंदे,आदर्श पिंपरे उपस्थित होते.