जन-धन व पी एम किसान चे पैसे पोस्टा मार्फत पण मिळणार

जन-धन व पी एम किसान चे पैसे
पोस्टा मार्फत पण मिळणार


लातूर:- जन-धन बचत खाते व पी एम किसान चे बचत खाते यामध्ये केंद्र सरकार कडून आलेले पैसे आता आपण पोस्टाच्या शाखेमधून किंवा पोस्टमन च्या माध्यमातून मिळवू शकतो. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी या संबंधीचे आदेश जारी केले आहे. जी बचत खाती आधार क्रमांकाशी जोडली आहेत, अशा खात्यावरील रक्कम अंगठा निशाणी मशिन वर करुन पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमन च्या माध्यमातून मिळू शकेलृ
 महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता इतर सर्व बँकेतील खातेदार ज्यांच्या खात्याला आधार क्रमांक जोडलेला आहे. असे पोस्ट ऑफिस मधून पैसे काढू शकतील. पोस्ट ऑफिस मधून या प्रकारचे पैसे काढण्याची मर्यादा प्रतिदिन दहा हजार (10,000/-) असणार आहे. लातूर शहरात हेड पोस्ट ऑफिस, लातूर येथे वरील सेवा उपलब्ध् आहे.तसेच पूर्ण जिल्हयात एकुण 272 पोस्ट ऑफिसेस आहेत आणि एकुण 279 प्रशिक्षित कर्मचारी आहेत.
 आधार क्रमांकाशी जोडलेल्या कुठल्याही बँकेच्या बचत खात्यावर व्यवहार या ठिकाणाहून करता येणार आहे. ही सुविधा सध्या उपलब्ध् असलेल्या ATM, बँक मित्र (BC) बँक शाखा व्यतिरिक्त राहील. त्यामुळे या ग्राहकांना सामाजिक अंतराचे भान बाळगत जास्तीची सेवा केंद्रे उपलब्ध् होत आहेत. या खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदाराला त्याचे आधार कार्ड/क्रमांक, बँक पासबुक व आधारला लिंक असलेला मोबाईल (OTP करिता) घेऊन पोस्टाशी संपर्क साधावा लागेल.
 या व्यवस्थेमुळे महिला जनधन व पिएम किसान चे लाभार्थी खातेदार या सर्वांची मोठी सोय होणार आहे. असे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्रीनिवासलू पुजारी यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.