उदगीर पालिका कर्मचारी व दिव्यांगाना अन्नधान्याच्या कीटचे वाटप

उदगीर पालिका कर्मचारी व दिव्यांगाना अन्नधान्याच्या कीटचे वाटप
उदगीर : येथील नगर परिषदेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना व शहरातील दिव्यांगाना नगर परिषदेच्या वतीने अन्नधान्याचे किट देण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला जाऊ नये याकरिता शासनाने लॉकडाऊन लागू केला आहे. याकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छ ठेवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. तर पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी देखील या काळात रस्त्यावर फिरून सर्व नागरिकांना पाणी मिळेल यासाठी काम करीत आहेत.
या दोन्ही विभागात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कायम कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांना कोरोनाच्या लोकडाऊन चा फटका बसला असून त्यांची अडचण लक्षात घेऊन पालिकेतील अधिकारी, पदाधिकारी, इतर अधिकारी कर्मचारी यांच्या आर्थिक सहयोगातून अन्नधान्य देण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच शहरातील दिव्यांग व्यक्तीनाही हे अन्नधान्याचे किट घरपोच देण्यात येणार आहेत.
काल मंगळवारी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, नगरसेवक मनोज पुदाले, ऍड. दत्ताजी पाटील, फैजुखा पठाण, शहाजी पाटील आदींच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांना हे किट देण्यात आले.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*